महावृत्त

मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामधील विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या ईशान्येकडच्या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज, गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त ए.के.जोती यांनी जाहीर केले. त्यानुसार त्रिपुरामध्ये १८ फेब्रुवारीला तर मेघालय आणि नागालँड या दोन राज्यात २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यांमधील मतमोजणी ३ मार्चला होणार असून आजपासूनच या तिन्ही राज्यांमध्ये आदर्श अचारसंहिता लागू झाली आहे. मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामध्ये मिळून विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. मेघालय विधानसभेची मुदत ६ मार्च, नागालँड विधानसभेची मुदत १३ मार्च आणि त्रिपुराची विधानसभेची मुदत १४ मार्चला संपत आहे.

लखनौमध्ये सहावीच्या विद्यार्थिनीचा पहिलीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

लखनौ -  लखनौमध्ये सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्याच शाळेच्या स्वच्छतागृहात शाळा लवकर सुटावी, म्हणून पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरड्याची मृत्यूशी झुंज सुरु असून त्याच्यावर किंग जॉर्ज्स मेडिकल युनिव्हर्सिटीतील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. लखनौमधील त्रिवेणीनगर भागातल्या ब्राईटलँड इंटरकॉलेज स्कूलच्या टॉयलेटमध्ये मंगळवारी हा प्रकार घडला. शाळेने हा प्रकार मीडियाला सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

अधिक वाचा:लखनौमध्ये सहावीच्या विद्यार्थिनीचा पहिलीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय भव्य एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी

ठाणे    तरुण रंगकर्मींना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय भव्य एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार, २० जानेवारी रोजी गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे. अंतिम फेरीतील विजेत्यांना प्रख्यात अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिक एक लाख रुपये आणि स्मृती चिन्ह असून द्वितीय व तृतीय पारितोषिक अनुक्रमे ७५ हजार आणि ३१ हजार रुपये आणि स्मृती चिन्ह आहे. लक्षवेधी एकांकिकेसाठी ११ हजार रुपये आणि स्मृती चिन्ह देण्यात येणार आहे.

अधिक वाचा:बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय भव्य एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी

वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-याविरोधात कठोर पोलीस कारवाईसाठी महावितरण आग्रही

मुंबई - वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणा-या महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याच्या घटना गांभिर्याने घेत मारहाण करणा-यांविरोधात कठोर पोलीस कारवई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत. महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट वीजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहेवीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे, ही परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी वीज देयकांचा नियमित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

अधिक वाचा:वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-याविरोधात कठोर पोलीस कारवाईसाठी महावितरण आग्रही