महावृत्त

ओखी वादळाचा जोर ओसरला

मुंबई - मुंबईपासून साधारण २०० किलोमीटरवर असलेले ओखी चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने सरकले असून या वादळाचा जोर ओसरल्यामुळे गुजरातवरचेही संकट टळले असले तरीही वादळाचा सर्वात जास्त फटका दक्षिण गुजरातला बसणार आहे. दरम्यान, ओखी वादळामुळं मुंबई, कोकण किनारपट्टीसह राज्यात इतर ठिकाणी सुरु झालेला पाऊस देखील ओसरला आहे. वादळाच्या संभाव्य धोक्यामुळे मोदी आणि अमित शाह यांच्या गुजरतमधील होणाऱ्या प्रचारसभा रद्द करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरीत काही ठिकाणी किनारपट्टीलगतच्या वस्त्यांमध्ये समुद्राचे पाणी शिरल्यामुळे मच्छिमार बांधवांमध्ये भीतीचं वातावरण होते. मात्र, ओखीचा धोका टळल्याचे वृत्त समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.. दरम्यान लाटांच्या तडाख्याने रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावर असलेल्या तिवरी बंदराकडे जाणारा रस्ता वाहून गेला आहे.