महावृत्त

महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीमसागर चैत्यभूमीवर

मुंबई -  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६१ वा महापरिनिर्वाण दिन. या दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईतील शिवाजी पार्कमधील चैत्यभूमीवर पोहोचले आहे. त्यामुळे संपूर्ण दादर परिसर भीम अनुयायांनी गजबजून गेला आहे .दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी लाखो भीमसैनिक बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दाखल होतात. मात्र यंदा ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या पावसाने शिवाजी पार्कात चिखल झाला आहे. तरीही भीमसैनिकांचा शिवाजी पार्ककडे येणारा ओघ सुरुच आहे.

दुसरीकडे महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला ओखी वादळामुळे झालेला पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे महिपालिकेने शिवाजी पार्कात बांधलेला मंडप कोसळून काही जण जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आला.