महावृत्त

गडचिरोलीत चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली -  गडचिरोली जिल्ह्यातील  अहेरी तहसीलच्या कल्लेड जंगलात आज, बुधवारी पहाटे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चमकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारास पोलिसांनी जोरदार प्रत्यत्तर देत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला. मागील महिन्याभरात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, गडचिरोली स्थानिक आणि छत्तीसगड पोलिस हे सतर्क होते. नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिकारी मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात तळ ठोकून होते. आज सात नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यामुळे पोलिसांच्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे.