महावृत्त

पोस्को स्टीलकंपनी तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन कोटी रुपयांचा धनादेश

मुंबई - पोस्को स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक गिल हो बँग यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन कोटी रुपयांचा धनादेश  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी पोस्को स्टील कंपनीचे संचालक मिस्टर आनपोस्को स्टील कंपनीचे उपमहाव्यस्थापक महेश गोखले यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेदिघी हे रायगड जिल्ह्यातील मोठे बंदर आहे. या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण आणि संसाधने उपलब्ध आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथे मोठी रिफायनरी असून या ठिकाणी ५० एकर जागा गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट ट्रस्ट येथे पोस्को स्टील कंपनीसाठी  हजार एकर जमिनीची आवश्यकता असून या ठिकाणी कोरियाच्या पोस्को स्टील कंपनीच्यामार्फत ३० कोटीची गुंतवणूक करण्याचे  प्रस्तावित आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहेअसे पोस्कोचे व्यवस्थापकीय संचालक बँग यांनी यावेळी सांगितले.