महावृत्त

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर : व्याजदरात बदल नाही

नवी दिल्ली - रिझर्व बँक ऑफ इंडियाने बुधवारी दुपारी द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो तसेच रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल केलेला नसून रेपो दर ६ टक्के तर, रिव्हर्स रेपो दर ५.७५ टक्के कायम ठेवला. आर्थिक वर्षात विकास दर ६. टक्के राहील असा अंदाजही बँकेने वर्तवला आहे.

दरम्यान, नवीन पतधोरण जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. निफ्टी बँक २००हून अधिक अंकानी कमी झाले असून सेन्सेक्समध्येही १९६  अंकाची घसरण झाली आहे. केंद्रीय बँकेच्या एमीसीने द्वैमासिक समीक्षेत रेपो रेट ६ टक्केच कायम ठेवला. तर रिझर्व्ह रेपो रेट ५.७५टक्के, सीआरआर ४ टक्के आणि एसएलआर १९. टक्के कायम ठेवला आहे. या समितीतील प्रो.रवींद्र ढोलकिया यांनी यावेळी ०.२५टक्के कपातीचे समर्थन पेले. पण इतर ५ सदस्यांनी त्यास नकार दर्शवला.