महावृत्त

दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला

नवी दिल्ली - दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आणि हिमाचल प्रदेश आज,बुधवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास भूकंपाच्या धक्क्याने हादरले.  या भूकंपाची तीव्रता ५.५ इतकी होती तर भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमध्ये होता. भूंकपात कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्यापतरी नाही.