महावृत्त

जयपूर न्यायालयाकडून लष्कर ए तोयबाच्या 8 जणांना जन्मठेप

जयपूर – जयपूरच्या न्यायालयाने लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या आठ सदस्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेशिवाय या सर्वांना प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्या सर्वांना राजस्थान "एटीएस'ने २०१० ते २०११ दरम्यान अटक केली होती. त्यामध्ये असगर अली, शक्कर उल्ला आणि शाहिद इक्‍बाल हे तिघे जण पाकिस्तानी नागरिक आहेत. तर अन्य पाच जण भारतीय आहेत.

मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून हे सर्वजण पाकिस्तानातील लष्कर ए तोयबाच्या कमांडरच्या संपर्कात होते. हे सर्व आरोपी दहशतवादी संघटनांचे सदस्य होण्याच्या आरोपांमध्ये दोषी आढळले आहेत. याशिवाय देशविघातक कारवायांच्या अन्य गुन्ह्यांमध्येही ते दोषी ठरले आहेत.