महावृत्त

लादेनच्या नातवाचा मृत्यू

वॉशिंग्टन - ओसामा बिन लादेनचा नातू ओसामा बिन हमजा बिन लादेन याचा मृत्यू झाल्याची माहिती अल-कायदाने एका पत्रकाद्वारे दिली आहे. तो बारा वर्षांचा होता. ओसामा बिन हमजा बिन लादेन याचा पाक -अफगाणिस्तान सीमेवरील हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत संभ्रमावस्था आहे. अल कायदासाठी काम करणाऱ्या ग्लोबल इस्लामिक मीडिया फ्रंटतर्फे इंग्रजीत अनुवाद केलेले एक पत्रक सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनने हे पत्र लिहीले आहे. त्या पत्रात माझा मुलगा आणि ओसामा बिन लादेनचा नातू ओसामा बिन हमजा बिन लादेन शहीद झालाअसे म्हटले आहे.