महावृत्त

पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांना मदत करणाऱ्यांना १० वर्ष तुरुंगवास

इस्लामाबाद - अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक आणि लष्करी मदत बंद केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत करणाऱ्यांना १० वर्ष तुरुंगवास, दंड आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद, मसूद अझहर यासह अन्य ७२  दहशतवादी संघटनांची यादी तयार करण्यात आली  असून या संस्थांना आर्थिक मदत करणाऱ्यांना पाकिस्तामधील दहशतवादविरोधी कायद्यानुसार ५ ते १० वर्षांचा तुरुंगवास किंवा १ कोटी रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावण्यात येईल. यासंदर्भात शनिवारी पाकिस्तानमधील सरकारी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.