महावृत्त

महात्मा गांधी यांच्या हत्येची पुन्हा चौकशी होणार नाही :सुप्रिम कोर्ट

नवी दिल्ली - राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसेनेच केली असून त्यांच्या हत्येचा पुन्हा नव्याने तपास होणार नसल्याचे न्यायमित्रांनी एमीकस क्युरी)यांनी सुप्रिम कोर्टात दिलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे. सुप्रिम कोर्टाने माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरेंद्र यांची न्यायमित्र म्हणून नेमणूक केली होती.त्यांनी गांधी हत्याकांडाशी निगडीत विविध दस्तऐवजांचा तपास केला आणि गांधीच्या हत्येचा पुन्हा एकदा तपास करण्याची गरज नसल्याची शिफारस सुप्रीम कोर्टने केली.

मुंबईतील अभिनव भारतचे ट्रस्टी डॉ. पंकज फडणीस यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये त्यांनी गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. गांधीजींच्या हत्येमागे परदेशी एजन्सीचा हात असू शकतो, असा संशय डॉ. फडणीस यांनी याचिकेद्वारे व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या याचिकेवरुन अनेक प्रश्न विचारले होते.  तसेच ज्येष्ठ अधिवक्ते अमरेंद्र शरण यांची अमॅकस क्मयुरी म्हणून नियुक्ती केली होती.