महावृत्त

बंगळुरुतील बारमध्ये भीषण आग : ५ जणांचा होरपळून मृत्यू

बंगळुरु - बंगळुरुमध्ये रविवारी रात्री अकराच्या सुमारास कुंभारा सांघा इमारतीमधील कैलास बारला लागलेल्या आगीत पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये या बारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. आग लागली त्यावेळी पाचही कर्मचारी बारमध्ये झोपले होते. आगीच्या धुरामुळे त्यांच्या गुदमरुन मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात आहे. परंतु आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.