महावृत्त

भारतीय वंशाचे अजिज अंसारी गोल्डन ग्लोब्स अॅवॉर्डने सन्मानित

नवी दिल्ली -  गोल्डन ग्लोब्स अॅवॉर्डचा सोहळा अमेरिकेत लॉस एन्जलिस इथे मोठ्या दिमाखात पार पडला. त्यावेळी भारतीय वंशाच्या अजिज अंसारीला टीव्ही मालिकेतला बेस्ट अॅक्टर अॅवॉर्ड मिळाला आहे. म्युझिकल आणि कॉमेडी कॅटेगिरीत हा अॅवॉर्ड 'द मास्टर ऑफ नन' या मालिकेतल्या भूमिकेसाठी मिळाला आहे. अंसारीचा हा पहिला गोल्डन ग्लोब अॅवॉर्ड आहे. गेल्या वर्षी याच मालिकेसाठी त्याला नामांकन मिळाले होते. अभिनेत्री निकोल किडमॅनला मालिका ''बिग लिट्ल लाइस''साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.