महावृत्त

'ओल्ड मंक' रमचे निर्माते कपिल मोहन यांचे निधन

गाझियाबाद - 'मोहन मीकिन लिमिटेड' या कंपनीचे अध्यक्ष  आणि'ओल्ड मंक' या रमचे निर्माते कपिल मोहन यांचे ६  जानेवारी रोजी गाझियाबादमध्ये दिर्घ आजाराने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पा मोहन आहेत. कपिल मोहन यांनी लष्करातून निवृत्त झाल्यानंतर 'मोहन मीकिन लिमिटेड' या कंपनीतून 'ओल्ड मंक'ची निर्मिती केली. जगात सर्वाधिक विकली जाणारी रम म्हणून ख्याती असलेल्या 'ओल्ड मंक'च्या  विक्रीला १९ डिसेंबर १९५४ रोजी सुरुवात करण्यात आली होती. कपिल मोहन यांना २०१० मध्ये 'पद्मश्री'ने गौरवण्यात आले होते.