महावृत्त

हवालाचे कोट्यावधी रुपये परदेशी घेऊन जाणाऱ्या हवाई सुंदरीला अटक

नवी दिल्ली - दिल्ली विमानतळावर एका हवाई सुंदरीला तिच्या एका साथीदारासह हाँगकाँग येथे हवालाचे तब्बल तीन कोटी वीस लाख रुपये घेऊन जात असताना महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री अटक केली. अटक करण्यात आलेली ही हवाई सुंदरी हाँगकाँगला जाणाऱ्या फ्लाइटमधील क्रू मेंबर होती. तीच्या सोबत असणारा तिचा साथीदार हा हवाल एजंट असून त्याचे नाव अमित मल्होत्रा असे आहे. मल्होत्रा एक ट्रॅव्हल एजन्सी चालवायचा. ज्याच्यामार्फत त्याने हवाला रॅकेट सुरु ठेवले होते. महसूल गुप्तचर संचालनालयने जेव्हा छापा मारला त्यावेळी या हवाई सुंदरीकडे चार लाख ऐंशी हजार डॉलर सापडले. या लाखो डॉलर्सची किंमत भारतीय मूल्याप्रमाणे तब्बल तीन कोटी वीस लाख रुपये एवढी आहे.