महावृत्त

राज्यासह देशभरात थंडीचा कडाका वाढला

मुंबई - राज्यासह देशभरात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये बोचऱ्या थंडीमुळे लोक गारठून गेले आहेत. साताऱ्याच्या वेण्णालेक परिसरात ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. मुंबईत काल नीचांकी म्हणजे १३. अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. वातावरणात गेल्या दोन दिवसांपासून असलेला गारवा आजही टिकून आहे. तर नाशिक जिल्ह्यातील निफाडचे तापमान तर ७. अंश सेल्सिअसवर आले आहे. निफाड परिसरात द्राक्षाचे सर्वाधिक पीक घेतले जाते. मात्र थंडीमुळे द्राक्षमण्यांची फुगवणी थांबली असून त्यांना तडे गेले आहेत, यामुळे द्राक्ष निर्यात होईल की नाही याची बागायतदारांमध्ये भीती आहे.