महावृत्त

भीमा-कोरेगाव : राहुल फटांगडेच्या कुटुंबियांना सरकारची १० लाखांची मदत

पुणे - राहुल फटांगडे या तरुणाचा भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी उसळलेल्या दंगलीत मृत्यू झाला होता. मृत राहुलच्या कुटुंबियांना यावेळी राज्य शासनाच्यावतीने आर्थिक मदत म्हणून १० लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज्य शासनाच्यावतीने काल, मंगळवारी मृत राहुल फटांगडेच्या आईला १० लाख रुपयांचा धनादेश बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पठारे उपस्थित होते.