महावृत्त

डॉक्टरांच्या वैद्यकीय परवान्याचे नुतनीकरण होणार ऑनलाईन

मुंबई - महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे वैद्यकीय व्यावसायिकांची संपूर्ण माहिती असलेले एम. एम. सी. मोबाईल ॲपमुळे वैद्यकीय व्यावसायिकांसह सामान्य जनतेला लाभ होणार आहे. या द्वारे डॉक्टरांना वैद्यकीय परवाण्याचे नुतनीकरण ऑनलाईन करता येणार आहेतर सर्व सामान्य रुग्णास आपल्या डॉक्टरांची संपूर्ण माहिती एका क्लीक द्वारे उपलब्ध होणार आहे. देशातील पहिले मोबाईल ॲप सुरु करणारे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे मी अभिनंदन करतोअसे उद्‍गार वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी काढले. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे वैद्यकीय व्यावसायिकांची संपूर्ण माहिती असलेले एम.एम.सी. या मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ.शिवकुमार उत्तुरे आणि सदस्य डॉ.अजित गोपछडे  उपस्थित होते.

 महाजन पुढे म्हणालेडिजीटल महाराष्ट्र्ला चालना देणारा हा अत्यंत स्त्युत्य उपक्रम असून या ॲपमुळे नोंदणीकृत असलेल्या सुमारे १ लाख ४० हजार वैद्यकीय व्यावसायिकांना परिषदेच्या कार्यालयात न येता देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असले तरी या मोबाईल ॲपद्वार परिषदेकडे ऑन लाईन अर्ज सादर करणेशुल्क अदा करणेतसेच परिषदेकडून तात्पुरत्या नोंदणीचे प्रमाणपत्रचांगल्या वर्तणुकीचे प्रमाणपत्रअसे विविध फायदे मिळणार आहेत.

आता पर्यंत विविध वैद्याकीय परवानग्या घेण्यासाठी डॉक्टरांना परिषदेच्या कार्यालयात स्वत: जावे लागत असे परंतु आता या पुढे त्यांना मोबाईल ॲपद्वारे सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. हे मोबाईल ॲप गुगल प्लेस्टोरवर उपलब्ध असून तेथून डाऊनलोड करुन घेता येईल. तसेच अशा प्रकारे ॲप डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास हे मोबाईल ॲप वैद्यकीय परिषदेच्या www.maharashtramedicalcouncil.in या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेता येऊ शकेल अशी माहिती वैद्यकीय  परिषदेचे अध्यक्ष डॉ.उत्तुरे यांनी दिली.

 ते पुढे असेही म्हणालेनोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाला मोबाईल ॲपद्वारे निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यशाळांना (सी.एम.ई) उपस्थित राहिल्यामुळे किती क्रेडीट पॉईंट मिळाले याची माहिती ही या ॲपव्दारे मिळू शकेल. परिषदेने परिषदेच्या वेबसाईटवर जी माहिती प्रसिध्द केलेली आहे ती माहिती देखील या  ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आली. 

कायमस्वरुपी नोंदणी करता वैद्यकीय व्यवसायिकांना ॲपद्वारे अर्ज सादर करणे तसेच ऑनलाईन शुल्क भरणे इ. कामे घर बसल्या करता येतील. तसेच नोंदणीच्या माहितीची वैधता ऑनलाईल तपासता येणार आहे.