महावृत्त

मुद्रा बँक योजना मिशन मोडवर राबविणार : सुधीर मुनगंटीवार

मुंबई - देशातील आर्थिक विषमता दूर करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेली मुद्रा बँक योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. योजनेतून मागील दोन वर्षात  ५० लाख ३८ हजार जणांना कर्ज वाटप करण्यात आले आहेअशी माहिती वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यापुढील काळातही ही योजना प्रभावीपणे राबवून बेरोजगारांचे जीवनमान बदलण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येतीलअसे त्यांनी यावेळी सांगितले.मंत्री मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुद्रा बँक योजनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री मुनगंटीवार म्हणालेगोरगरिबांना विना तारण आणि विना जामीन कर्ज मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वाकांक्षी अशी मुद्रा बँक योजना सुरू केली आहे. मागील साधारण दोन वर्षात राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. योजनेतून २०१६ - १७ मध्ये १६.९ हजार कोटी रुपयांचे तर २०१७ - १८ मध्ये आतापर्यंत ८.८ हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. २०१६ - १७ मधे ३३ लाख ४४ हजार तर २०१७ - १८ मधे आतापर्यंत १६ लाख ९३ हजार इतक्या बेरोजगारांना आपण या योजनेतून व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले आहे. यापुढील काळातही मिशन मोडवर ही योजना राबवून जास्तीत जास्त बेरोजगारांना कर्ज आणि कोशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईलअसे त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री मुनगंटीवार म्हणालेया योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यात यावी. याबरोबरच फक्त कर्ज वितरण न करता लाभार्थ्याला कौशल्य विकास प्रशिक्षणही देण्यात यावेत्यामुळे मिळालेले कर्जाचे पैसे त्याला योग्य पद्धतीने वापरता येतील. प्रशिक्षणकार्यशाळा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यावरही भर देण्यात यावाअशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

मागील दोन वर्षांच्या काळात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक तर नंदुरबार आणि गडचिरोली जिल्ह्यात कमी कर्जवाटप झाल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. त्यावर योजनेचा उद्देशच आर्थिक विषमता दूर करणे हा आहेत्यामुळे राज्यातील विशेषतः मागास जिल्ह्यातही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावीअशा सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

नोकरी मागणाऱ्या हातापेक्षा नोकरी देणाऱ्या हातांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. या धोरणातूनच पुढे आलेल्या या योजनेला अधिक प्रभावी करण्यासाठी त्याची कौशल्य विकास विभागस्टार्टअप योजनाबचतगट विषयक विविध योजना यांच्याशी सांगड घालून पुढील आर्थिक वर्षातही ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येईलअसे मंत्री मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

बैठकीस आमदार अनिल सोलेवित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैननियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती,कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ताआयटी सचिव श्रीनिवासनएसएलबीसीचे समन्वयक मस्केग्रामीण जिवनोन्नती कार्यक्रमाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्यासह मुद्रा बँक योजनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीचे विविध सदस्य आदी उपस्थित होते.