महावृत्त

दिल्ली विमानतळावर लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याला अटक

नवी दिल्ली दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लष्कर-ए-तैयबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बिलाल अहमद याला दिल्ली पोलीसांच्या विशेष सेल आणि गुजरात एटीएसच्या पथकाने बुधवारी अटक केली. तो श्रीनगरवरून दिल्लीला येत होता. बिलाल हा २२ डिसेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आहे. या हल्ल्यात दोन सैनिकांचा आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, प्रजासत्तकदिनाच्या काही दिवसांआधीच बिलालला अटक करण्यात आल्यामुळे घातपात करण्याचे डाव उधळून लावण्यात एटीएसला यश आले आहे.