महावृत्त

मोदी सरकार नोटाबंदीनंतर नाणेबंदी करण्याचा निर्णय घेणार

नवी दिल्ली – मोदी सरकार आता नोटाबंदीनंतर नाणेबंदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असून त्यासाठी नोएडा, मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद येथील टाकसाळीत नाणी पाडण्याचे काम थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती रिझर्व बॅंकेच्या अधिकाऱ्याने दिली. नोटाबंदीनंतर देशभरातील विविध टाकसाळीत मोठ्या प्रमाणात नाणी पाडण्यात आली होती. पण ही नाणी अजूनही मोठ्या प्रमाणात रिझर्व बॅंकेत पडून आहेत. रिझर्व बॅंकेसमोर ही नाणे वितरणीत करण्याचे मोठे आव्हान आहे.

छोटे दुकानदार ग्राहकांकडून नाणे स्विकारत नाहीत. पाच आणि दहा रुपयांची मोठी नाणी काही दुकानदार घेतात. मात्र, एक आणि दोन रुपयांची नाणी घेण्यास सर्वजण नकार देतात. त्यामुळे रिझर्व बॅंकेकडे ८ जानेवारीपर्यंत सुमारे MPC (चलनविषयक धोरण समिती)कडे २५०० लाखापेक्षा जास्त नाणी पडून आहेत.त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत टाकसाळीत नाणी पाडण्याचे काम थांबवण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.