महावृत्त

पुन्हा एकदा मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी जाताना हेलिकॉप्टर लँड होतेवेळी दोन इमारतींच्या मधून हेलिकॉप्टर खाली येऊ लागले. पण तेवढय़ात दोन इमारतींच्या मधे लटकत असलेली केबलची वायर पायलटला दिसली. त्याने लगेचच पुन्हा हेलिकॉप्टरचे टेकऑफ केल्यामुळे अनर्थ टळला. यापूर्वीही लातूरमध्ये मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.