महावृत्त

इस्रोने रचला इतिहास ; १०० व्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोटा - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात इस्रोने आज नवा इतिहास रचत इस्रोचे पीएसएलव्ही सी- ४० हे प्रक्षेपकाने ३१ उपग्रहांसह अंतराळात झेप घेतली. यात तीन भारतीय तर २८ विदेशी उपग्रहांचा समावेश आहे. अवकाशात झेपावलेले इस्रोचे हे शंभरावे उपग्रह आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले.

आज, शुक्रवार सकाळी ९.२८ वाजता एकत्र ३१ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यामध्ये ३ भारतीय व २८ परदेशी उपग्रहांचा समावेश आहे. यात कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, दक्षिण कोरिया ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. खासगी क्षेत्राच्या सहभागातून बनवलेला पहिला भारतीय उपग्रह आयआरएनएसएस- १ एच हा प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न चार महिन्यांपूर्वी अयशस्वी ठरला होता. पीएसएलव्ही अग्निबाणाने आजवर ४१ वेळा उपग्रहांसह अवकाशात भरारी घेतली होती.