महावृत्त

जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानावर

नवी दिल्ली -  जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसरे स्थान पटकावले आहे. गॅलप इंटरनॅशनल असोसिएशन आणि सी वोटर इंटरनॅशनलने केलेल्या सर्व्हेत जगातील नेत्यांचे रॅकिंग जाहीर केले असून त्यात जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्कल पहिल्या क्रमांकावर आहेत, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुअल मॅक्रां दुसऱ्या स्थानावर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानावर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनाही मागे टाकलं आहे. २०१५ साली झालेल्या रँकिंगमध्ये बराक ओबामा पहिल्या स्थानावर तर मोदी पाचव्या स्थानावर होते.