महावृत्त

मेझॉनचे सीईओ जेफ बेजोस गातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

न्यूयॉर्क - ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली आहे. ब्लूमबर्ग आणि फोर्ब्सकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या श्रीमंत व्यक्तीची यादी जाहीर करण्यात आली त्यात बेजोस अव्वल स्थानी असल्याचे दिसत आहे.याआधी हा विक्रम मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सच्या नावावर होता. १९९९ साली त्याची संपत्ती १०० अब्ज डॉलर एवढी होती. पण आता बेजोसने त्याचा विक्रम मोडीत काढला आहे.

ब्लूमबर्गच्या मते, बुधवारपर्यंत बेजोसची संपत्ती १०६ अब्ज डॉलर एवढी होती. तर फोर्ब्सनुसार त्याची संपत्ती १०५ अब्ज डॉलर एवढी आहे. अमेझॉनच्या शेअरमधून बेजोसकडे सर्वाधिक संपत्ती जमा झाली आहे. २०१७ मध्ये त्याचे शेअर जवळजवळ ५७ टक्क्यांपर्यंत पोहचले होते. दरम्यान, बिल गेट्स आजही श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याची एकूण संपत्ती ९२ अब्ज डॉलर आहे.