महावृत्त

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घासटन

मुंबई - वाहनाचे नोंदणीकरणजमिनीचे अभिलेखमालमत्तेची नोंदणी यासारख्या बाबींची आनलाईन नोंद ठेवण्यासाठी तसेच त्यात फेरबदल करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान ‘ब्लॉकचेन’ वापरण्यात येणार आहे. या संदर्भात राज्यशासनाने पुढाकार घेतला असून  'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ जानेवारी रोजी ट्रायडेंटनरिमन पॉईंटमुंबई येथे एक दिवसीय परिषदेचे एक आयोजन करण्यात येणार असल्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही आर श्रीनिवास यांनी सांगितले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या परिषदेबाबत अधिक माहिती देताना ते म्हणालेया परिषदेचे उद्‍घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून याची संकल्पना "डिजिटल ट्रान्सफॉर्मशन थ्रू ब्लॉकचेन" ही आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य करणारे  तज्ञ , नव उद्यमीउद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच आंतरराष्ट्रीय वक्ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यंनी सांगितलेब्लॉकचेन तंत्रज्ञान परिषदेच्या माध्यमातून उद्योगतंत्रज्ञान,प्रशासन आणि जनसामान्यांना एकत्रितपणे आणण्याचे स्तुत्य काम FICCI सारख्या कंपनीने केले आहे. या परिषदेच्या यशस्वीततेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.