महावृत्त

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक

नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ताफ्यावर बक्सर जिल्ह्यातील नंदर भागातून जात असतान अचानक एका जमावाने दगडफेक केली. या हल्ल्यातून मुख्यमंत्री नीतीशकुमार बालंबाल बचावले आहेत. मात्र, दगडफेकीमध्ये नीतीशकुमार यांच्या ताफ्यातील गांड्यांच्या काचा फुटल्या असून यात काही सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. हा हल्ला गावात कोणताही विकास न झाल्यामुळे करण्यात आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री नीतीश कुमार सध्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बिहार राज्याचा दौरा करत आहेत. मागच्या वर्षी ७ डिसेंबरला हा दौरा सुरु झाला असून या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत कामांचा आढावा घेत आहेत.