महावृत्त

न्यायाव्यवस्थेसाठी आज काळा दिवस : उज्ज्वल निकम

मुंबई - देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच चार न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायव्यवस्थेसाठी आजचा दिवस काळा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. तक्रार मांडण्यासाठी या ज्येष्ठ वकिलांनी पत्रकार परिषदे घेण्याऐवजी इतर मार्गांचा अवलंब करायला हवा होता. आता या प्रकारामुळे सामान्य माणूस न्यायालयाच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो, शंका उपस्थित करू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र या चारही न्यायाधीशांच्या कृतीचे समर्थन केले आहे. या न्यायाधीशांनी उपस्थित केलेला मुद्दा फार गंभीर आहे. हे चारही न्यायाधीश अत्यंत प्रामाणिक आहेत. त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही,’ असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा,’ अशी मागणीही स्वामींनी केली.