महावृत्त

डहाणूत बोट बुडाली : ३२ विद्यार्थ्यांना वाचवले, ८ अद्यापही बेपत्ता

 

 

पालघर - पालघर जिल्ह्यातल्या डहाणू पारनाका येथील समुद्रात आज, सकाळी साडे अकराच्यासुमारास ४० विद्यार्थ्यांना  समुद्रात घेऊन गेलेली बोट बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. यातील ३२  विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले असून आठ विद्यार्थी अद्यापी बेपत्ता आहेत.

 

प्राप्त माहितीनुसार पालघर जिलह्यातील के. एल. पोंडा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सहल गेली होती.यावेळी ४० विद्यार्थ्यांना घेऊन डहाणूच्या समुद्रात एक बोट गेली. मात्र अचानक बोट उलटून विद्यार्थी पाण्यात पडले.

यावेळी समुद्रात असलेल्या इतर बोटींतील मच्छिमारांनी या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टरही शोध कार्यात सहभागी झाले आहे, अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी दिली.