महावृत्त

डहाणूजवळ ओएनजीसीचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले, चार जणांचा मृत्यू

पालघर - पालघर जिल्ह्यातील डहाणू पूलाजवळ आज,शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ओएनजीसीचे डाऊफिन एएस ३६५ एन ३  हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत सात पैकी  चार जणांचा  मृत्यू झाला असून इतर तीघांचा शोध सुरू आहे. ओएनजीसीचे डाऊफिन एएस ३६५ एन ३ हे  हेलिकॉप्टर दोन पायलट्स व इतर पाचजणांना घेऊन आज सकाळी ओएनजीसीच्या समुद्रातील तेल केंद्राजवळ निघाले होते. हेलिकॉप्टर ठराविक वेळेत तेल केंद्राजवळ पोहचले नसल्यामुळे ओनेजीसीकडून इंडियन कोस्ट गार्डला याबद्दलची माहिती देण्यात आली. त्यानंतर तटरक्षक दलाने शोध मोहिमेला सुरुवात केली. तर नौदलाच्या काही बोटी आणि विमाने डायव्हर्ट करुन हेलिकॉप्टरचा शोध सुरु केल्यानंतर हेलिकॉप्टरचे अवशेष समुद्रात सापडले. दरम्यान, बेपत्ता झालेले  हेलिकॉप्टर ओएनजीसीचेच  असल्याचे स्पष्ट झाले.