महावृत्त

सांगली जिल्ह्यात भीषण अपघात : ६ पैलवान जागीच ठार

सांगली - सांगली जिल्ह्यातील वांगी येथील शिरगाव फाटय़ाजवळ आज,शनिवारी पहाटे क्रूझर गाडी आणि ऊसाची वाहतूक करणारा ट्रक्टर यांचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा पैलवानांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. विजय शिंदे ,आकाश देसाई ,शुभम घारगे, सौरभ माने अविनाश गायकवाड, रणजित धनवडे अशी मृतांची नावे असून अजय कसुरडे, अनिकेत जाधव, अनिकेत गावडे, रितेश चोपडे,  अनिल पाटील, प्रतीक निकम,  तुषार निकम हे जखमी झाले आहेत. या घटनेने कुस्ती शौकिनांवर शोककळा पसरली आहे.

मृत सर्व पैलवान हे क्रांती कुस्ती संकुल कुंडलचे पैलवान आहेत. हे सर्व पैलवान सातारा औध येते कुस्त्यांना गेले होते. तिथून परतत असताना शिरगाव फाट्यावर समोरून ऊस भरुन येणाऱ्या ट्रॅक्‍टरची पैलवनांच्या क्‍लूझरला धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात क्रूझर मधील ६ पैलवान जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच चिंचणी वांगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना मिरजेच्या मिशन हॉस्पिटल आणि पलूसच्या रुग्णालयात पाठवून दिले.