विशेष लेख

श्यामच्या आईची स्मृतीशताब्दी

यशोदा सदाशिव साने, श्यामची आई नावाच्या प्रसिद्ध आईच्या निधनाला यंदा, मृत्यू २ नोव्हेंबर १९१७ रोजी शंभर वर्षे होतील. या घटनेची स्मृतीशताब्दी गेल्या २ नोव्हेंबर २०१६ला सुरू झाली आहे. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृती शताब्दी महाराष्ट्र साजरी करतो आहे. ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती, एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती किंवा एखाद्या राजघराण्यातील सुद्धा नव्हती. कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. तिचा साधा फोटो ही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे पुजावे हे विलक्षण आहे.

अधिक वाचा:श्यामच्या आईची स्मृतीशताब्दी

महाराष्ट्र हरित सेना

महाराष्ट्रात दि. १ जुलै २०१६ रोजी जनतेच्या सहभागातून २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला होता तो उर्त्स्फूत लोकसहभागातून पूर्ण झाला एवढेच नाही तर या एकाच दिवशी राज्यात २ कोटी ८३ लाख झाडं लागली. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये घेण्यात आली. सर्व क्षेत्रातील सर्व वयोगटातील लोकांच्या प्रामाणिक आणि स्वंयर्स्फूत सहभागाने हे यश संपादन करता आले.

अधिक वाचा:महाराष्ट्र हरित सेना

अतिथी देवो भाव !

अतिथी देवो भाव

रश्मी महांबरे 

 

भारतीय संस्कृती जगात वेगळी आहे कारण आपल्या काही परंपरा, रूढी आणि संस्कार जगात एकमेव आहेत. .. आणि त्यातीलच एक संस्कार म्हणजे 'अतिथी देवो भाव.' आलेल्या पाहुण्याला देव मानणारी आपली संस्कृती मानवतेच प्रतीक आहे. घराघरातून सहज घडणार हा संस्कार .. अन त्यामुळेच कदाचीत वेगळी 'ह्युम्यानीटी, मोराल सायन्स" शिकवाव लागत नसे.

अधिक वाचा:अतिथी देवो भाव !