विशेष लेख

सुका पाऊस…

पाऊस हा निसर्गाचा अनाकलनीय चमत्कार आहे असाच माझा ठाम विश्वास आहे. स्वर्गातून बरसणाऱ्या या  अमृत धारा अनेक जीवांना तृप्त करतात .. जीवन देतात . पाऊस म्हणजे पाणी , पर्जन्य चक्राचा एक भाग, कसा येतो, कसा पडतो.. ही शास्त्रीय माहिती असली तरीही .. मनाला मोहून टाकणाऱ्या पावसाच्या बाबतीत ती रुक्षच वाटते...

 

तो आकस्मिक असतो, जादूई असतो, कधी हळवा असतो, तर कधी लाजाळू असतो.. हळूच डोकावतो .. पुन्हा लपून बसतो, तर कधी बेधडक,  रांगडा.. चिंब भिजवून 'स्वत्व' विसरायला लावणारा असतो... मला भेटणारा  पाऊस हा अस्साच असतो.. तो कोसळणारा असतो, झोडपणार असतो, वाऱ्याबरोबर तुफान मस्ती करणारा असतो, खूपच रागावला तर अविरत बरसतो.. रागावलेल्या बाबांसारखा.. कुणाची काय बिशाद, सगळे चिडीचूप घरात बसून... तरीही तो आवडतो.  तर कधी तो आई सारखा कुशीत घेऊन प्रेमाने समजावणारा .. रागावण्या मागचं कारण सांगणारा. म्हणूनच त्याच्या कुशीत जायला मी केव्हाही तयार असते. त्याच्या संगतीनं फिरायला तयार असते. 

कंपनी होती, पाऊस तर सारखा बोलावत होता पण..  आज मात्र पावसात जाऊ नयेस वाटलं.. एका थेंबानेही आपल्याला स्पर्श करू नये अस वाटलं.. त्यामुळे नंतर दिवसभर बाहेर पडलेच नाही.. कधी खिडकीतून तर कधी गॅलरीतून त्याच तांडव.. त्याची चीडचीड बघत राहिले..पण मला जावंस वाटलंच नाही. त्यामुळे आजचा पाऊस सुकाच राहिला. 

रश्मी महांबरे

आर जे 

१००. ७ एफ एम गोल्ड