विशेष लेख

शांती कुठे असते...

काय असतं नेमकं जगण म्हणजे??? आला दिवस आनंदात घालवणं  की आला तसाच पुढे ढकलणं ??? प्रत्येकाच्या संकल्पना, विचार, वेगळे असतात...ते त्याच्या जडणघडणीवर आणि परिस्थितीवर अवलंबून असतात. आज आवडलेला, पटलेला  विचार  कदाचीत नंतर आवडत नाही... अगदी त्याच्या विरुद्ध विचार आवडायला लागतात. का होत हे असं??

मग विचार म्हणजे तरी काय असत??

कुठून आणि कसे येतात हे हे विचार?? का येतात ??

विचारा शिवाय आपण असू शकतो का ??

कदाची नाही .... पण विचार थांबवता येऊ शकतात .... आपले 'योगशास्त्र '  तसं सांगत आणि मला वाटत ... यालाच कदाचित 'शांती' म्हणतात. कुणाला मिळते हि  'शांती'?? खरंच विचार थांबवणे शक्य होते का ??

खरेतर हे प्रत्येकालाच शक्य आहे... फक्त त्याच कौशल्य आत्मसाद करायला हवं. एकदा का हे टेक्निक जमल की मग ही शांती तुमचीच... हवी तेव्हा.. हवी तीतका वेळ.

रोजच्या जीवनात अशी काही माणसं भेटतात ज्यांना हे टेक्निक आधीच जमलेले असतं... कदाचीत त्यांना तो 'शांती' मिळवण्याचा मार्ग गवसलेला असतो त्यामुळे विचार थांबवणं, विचार सोडून देणं त्यांना सहज शक्य होतं किंबहुना त्यांनी तो आपल्या जीवनाचा मार्ग बनवलेला असतो... The Way of Life .. And after some time it became "Art Of Life."

 रश्मी महांबरे

आर जे 

१००. ७ एफ एम गोल्ड