विशेष लेख

विवेकाची कास

विवेकाची कास

रमेश झवर

फेडूनी अविवेकाची काजळी। विवेकदीपु उजळी। तई योगिया पाहे। दिवाळी निरंतर।। - ज्ञानेश्वरमहाराज

ह्या ब्लॉगलेखाच्या सुरूवातीलाच ज्ञानेश्वरमहाराजांची ओवी दिल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल! परंतु उत्तरेत तीर्थयात्रा करत असताना ज्ञानेश्वरांनी नामदेवांना मुद्दाम बरोबर घेतले होते. ह्या यात्रेत घडलेल्या सहवासात ‘भक्तीतत्त्व काय आहे हे मला शिकवा’ अशी विनंती ज्ञानोबांनी नामदेवमहाराजांना केली तर ‘मला योगतत्त्व समजावून सांगा’ अशी विनंती नामदेवमहाराजांनी ज्ञानोबांना केली होती. आज महाराष्ट्राला जे ज्ञानेश्वरांचे चरित्र माहीत झाले ते नामदेवगाथेमुळेच!

अधिक वाचा:विवेकाची कास

सैनिकांचे बलिदान व्यर्थ ना जावो!

सैनिकांचे बलिदान व्यर्थ ना जावो!

ड. प्रभाकर येरोळकर, लातूर
9860455785

मृत्यूमुळं माणसाचं आयुष्य भलेही संपत असेल परंतु त्याने निर्माण केलेली नाती संपत नसतात. युद्धसेवा मेडल प्राप्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी आपल्या छत्तीस वर्षांच्या भारतीय लष्करातील सेवेचा अनुभव घेऊन 'आव्हान चिनी ड्रॅगनचे' आणि 'आव्हान जम्मू आणि काश्मीरमधील छुप्या युद्धाचे' ही दोन पुस्तके लिहिली आहेत.

अधिक वाचा:सैनिकांचे बलिदान व्यर्थ ना जावो!

२०१५; बदलाची नांदी

१५; बदलाची नांदी

ड. प्रभाकर येरोळकर, लातूर

9860455785

सरत्या वर्षातील आपल्या आजूबाजूला घडणार्‍या घटनांमधून जी कोणती गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे लोक शेती या विषयावर अचानक बोलू लागले आहेत. कुणीही उठतो आणि तज्ज्ञ म्हणजे कृषीतज्ज्ञ असल्याच्या अविर्भावात या विषयावर मते मांडतो.
बांधावर जाऊन शेतात राहून मी अनुभव घेणार या अट्टहासापायी एक जण म्हणजे सुशिक्षित पांढरपेशी वगैरे मध्यमवर्गीय रानात जाऊन अधूनमधून राहू लागला. मग सोशल मीडियावर कधी रात्रीच्या चांदण्यात आभाळ कसे लखलखते वगैरेंसारखी वक्तव्ये टाकणे सुरू झाले. मधुनच कविताही करून झाल्या. एकंदरीत सुरुवातीचा शेतीविषयक अनुभव रोमँटिक या सदरात मोडणाराच होता. शहरातील गोंगाटापासून दूर, कसं छान छान वाटतंय, असं सगळं सुरू होतं. फेसबुकवर व्हॉटस् अपवर रानातल्या निसर्गाचे, गायी वासरांसोबत खेळत असलेले, अशा पद्धतीची छायाचित्रे येणे सुरू झाले. मग ओघानेच त्यांना लाईकस मिळणेही सुरू झाले. एकंदरीत हा सिलसिला वाढत चालला आणि एके दिवशी अचानक अवकाळी पाऊसच आला.

अधिक वाचा:२०१५; बदलाची नांदी