विशेष लेख

हॅपी न्यु इअर सेलिब्रेशन..पण जरा जपून..

लेखक - डॉ.राजू पाटोदकर

 

नववर्षाच्या स्वागताचा आनंद घेतांना या आनंदाचा बेरंग होऊ देऊ नका, पोलीस, आर.टी.ओ. विभागाकडून वाहन चालविण्याबद्दल असलेल्या महत्वाच्या म्हणजे 'डोन्ट ड्रिंक ऍ़न्ड ड्राईव्ह' या सुचनेकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. आपला जीव जसा अनमोल आहे तसाच तो इतरांचाही आहे. आपल्या कुटूंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण सर्वजण समजदार आहोतच पण कधी कधी अतिरेक होतो आणि मग.. .. असो या बद्दल जास्त चर्चा नको.

कोकणात फिरायला येतांना समुद्राचे आकर्षण असलेली बरीच हौशी पर्यटक मंडळी अथांग सागर व सागर किनारा पाहून भाराऊन जाते. आणि मग स्विमींग चॅम्पीयन असल्यासारखे वागून पाण्यात स्वत:ला झोकून देतात. इथेच मोठा घोटाळा होतो. उत्साहाच्या भरात आपण सागराच्या आत किती लांबवर आलो ते कळत नाही. शेवटी जे नको ते होते. त्याचेही भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. सागर किनारी, बीचवर लावण्यात आलेल्या सूचनांचे पालन करा व आपला आनंद द्विगुणीत करा.

वाहन असो की फटाके आनंदाच्या भरात याचा आवाज किती मोठा होतो हे अनुभवल्या शिवाय कळत नाही. प्रदूषणाचा कळस होतो. इतरांना त्याचा त्रास होतो. हे त्यावेळी समजत देखील नाही. तेव्हा पर्यटन, नववर्ष साजरे करतांना अगदी आपल्याकडून हे टाळले गेले तर त्याच लाभ मोठ्या प्रमाणात इतरांना होऊ शकतो हे लक्षात ठेवाच.....

सार्वजनिक ठिकाणी वावरतांना कसे वागावे, कसे चालावे, बोलावे याबाबत स्वत:ची अशी प्रत्येकाची आचारसंहिता असते. घरापासून, आपल्या प्रदेशापासून थोडे दूर विशेषत: पर्यटन अथवा अन्य कामासाठी आपण आलो की थोडे मोकळेपणा येतो आणि मनातील सुप्त गुणांना वाव मिळतो. विशेष म्हणजे मित्रवर्ग सोबत असेल तर आणखी जास्त उधाण येते. नववर्षाचे स्वागत करताना, होळीचा सण साजरा करताना हे जास्तच होते.

नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना, जल्लोश करत असतांना आपल्या स्वत:सोबत इतरांचीही काळजी घेणे महत्वाचे असते. कुठल्याही प्रकारची नशेबाजी करुन अतिउत्साहामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे उचित ठरेल. मद्यपान करुन समुद्रामध्ये पोहण्यास जाणे शक्यतो टाळावे तसेच पोहण्यास येत असेल नसेल तरीही खोल समुद्रामध्ये पोहण्यास जाण्याची जोखीम घेऊ नका, स्थानिकांच्या तसेच किनाऱ्यावरील जीवरक्षकांच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या, आपल्यामुळे इतरांच्या उत्साहास  त्रास होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. नववर्षाच्या या आनंददायी सोहळ्यास अनुचित प्रकाराच्या निमित्ताने गालबोट लागणार नाही हे पहावे आणि आनंदाने नववर्षाचे स्वागत करावे हेच या लेखानिमित्त आवाहन.. 

अपरान्तातील प्राचीनतेला संशोधन केंद्राचे कोंदण

लेखक : धीरज वाटेकर (पर्यटन अभ्यासक), चिपळूण

मो. 9860360948

चिपळुणात दोन वर्षापूर्वी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर समृध्द कोकणाच्या इतिहासाचे जतन व्हावे या उद्देशाने सोडलेला अपरान्त संशोधन केंद्र संकल्पाची मुहुर्तमेढ शुक्रवारी (दिनांक १९ डिसेंबर २०१४ रोजी) चिपळूणमध्ये रोवली गेली. विद्यावाचस्पती, प्राचीन मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक, पुरातत्व संशोधक डॉ.गो..देगलूरकर, गड-किल्ल्यांचे अभ्यासक, नामवंत लेखक प्र.के.घाणेकर, अंटार्क्टिका संशोधक सुहास काणे, अपरांताचा खराखुरा प्रवासी, नऊ ताम्रपटांचा शोध लावणारे कोकणातील नामवंत संशोधक अण्णासाहेब शिरगावकर आदिंच्या उपस्थितीत अरविंद तथा अप्पा जाधव अपरान्त संशोधन केंद्राच्या उभारणीची घोषणा झाली. येथील लोकमान्य टिळक वाचन मंदिराच्या पुढाकाराने हे संशोधन केंद्र सुरू होणार आहे, ही कोकण अभ्यासकांसाठी आनंददायी घटना आहे. विविध विषयांवरील सुमारे ६५ हजार पुस्तके, दुर्मिळ हस्तलिखिते व पोथ्यांचा मौलिक संग्रह या वाचन मंदिरात आहे. या अपरान्त संशोधन केंद्रामध्ये कोकणातील ऐतिहासिक दस्तऐवजांची जपणूक होणार आहे. तसेच विविध लोककला, लोकवाङमय, पुरातन दस्तऐवज, शिल्प, हस्तलिखित आदी वस्तूंचा संग्रह केला जाणार असून, त्यांचा अभ्यासकांना उपयोग होणार आहे, अशी माहिती वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी दिली. या सार्‍या पार्श्वभूमीवर कोकणातील प्राचीनतेवर छायाचित्रांच्या माध्यमातून टाकलेला हा प्रकाशझोत...

 

अधिक वाचा:अपरान्तातील प्राचीनतेला संशोधन केंद्राचे कोंदण

बदललेला निसर्ग आणि चुकीचे सरकारी नियोजन

ड. प्रभाकर येरोळकर, लातूर

9860455785

'आला क्षण भूतकाळात जमा होतो आणि आजचा काफीला उद्या पुढं गेलेला असतो'; असं एक सुंदर वाक्य आहे. राज्यातसुद्धा दुष्काळजन्य परिस्थिती आहे. ती तशीच राहील आणि परिस्थिती बदलणारच नाही, असे नाही; परंतु दुष्काळ हा काही भागात तरी शेतकर्‍यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे, अशी एक नवीन म्हण तयार होते आहे. एकीकडे बदललेला निसर्ग आणि दुसरीकडे चुकीचे सरकारी नियोजन, दोन्हींचाही परिणाम आहे. विशेषत: कोरडवाहू शेतकरी आणि त्यातून अल्पभूधारक कायम दुष्काळाच्या छायेत आहे. त्यातून महाराष्ट्रासारख्या राज्यातील पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आदी विभागांत पुन: वेगवेगळी स्थिती असते. त्यामुळे सरसकट एखादी उपाययोजना लागू करणे व्यवहार्य नसते.

अधिक वाचा:बदललेला निसर्ग आणि चुकीचे सरकारी नियोजन