विशेष लेख

बुद्धिबळाचा खेळ

बुद्धिबळाचा खेळ

रमेश झवर

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

देवेंद्र फडणविसांच्या अल्पमतातल्या सरकारपुढे पडणेहा एकच पर्याय नाही. मुदतपूर्व निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागा असे आवाहन राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात शरद पवार यांनी केले. पवारांच्या या अकाली आवाहनामुळे देवेंद्र फडणविसांच्या सरकारला लगेच भूकंपाचा हादरा बसेल असे कोणाला वाटत असेल तर ते बरोबर नाही. इमारतींची पडझड होण्यासाठी किमान आठ रिश्टर स्केलइतका किंवा त्याहून मोठा भूकंप व्हावा लागतो. शरद पवारांच्या या आवाहनामुळे सरकार फारतर किंचित हलले असू शकेल!

अधिक वाचा:बुद्धिबळाचा खेळ

सोशल मीडिया हे एक प्रभावी साधन !

सोशल मीडिया हे एक प्रभावी साधन !

ड. प्रभाकर येरोळकर, लातूर
9860455785

डॉ. प्रकाश बाबा आमटे (दि. रियल हीरो) हा मराठी चित्रपट सध्या जोरात चालू आहे. काही इंग्रजी आणि मराठीही वृत्तपत्रातून, जीवंत माणसाच्या आयुष्यावरील काढलेला हा सिनेमा तितकासा जमलेला नाही. कारण काही वेळा तो 'डॉक्युमेंटरी टाईप' वाटतो. फ्लॅश बॅक पद्धतीचा वापर केल्याने बर्‍याच वेळा लिंक तुटते. वगैरे टीका झाली; परंतु मला काही ती पटली नाही. चित्रपट बघितल्यानंतर मराठीतला एक उत्तम सिनेमा आणि प्रेक्षकांना अगदी खुच्र्याना खिळवून ठेवणारा, शिवाय नाना आणि सोनाली यांचा हृदयस्पश्री अभिनय, दिग्दर्शकाचे सादरीकरण अगदी श्रेष्ठ दर्जाचे होते. असेच माझे मत बनले. आणि ते सोशल मीडियावर व्यक्त करण्याची संधीही लगेच मिळाली.

अधिक वाचा:सोशल मीडिया हे एक प्रभावी साधन !

‘सतित्वा’चा भंग नव्हे!

सतित्वाचा भंग नव्हे!

रमेश झवर

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

तात्त्विक काथ्याकूट आणि वाटाघाटींची गणितं बाजूला सारत देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या सरकारचा विश्वासनिदर्शक ठराव आवाजी मतदानाने संमत करून घेतला! विश्वासनिदर्शक ठराव अशा प्रकारे संमत करून घेणे कितपत योग्य आहे? मुळात घटनेत विश्वासनिदर्शक ठराव संमत करून घेण्याची तरतूदच नाही. घटनेत आहे ती अविश्वासाचा ठराव आणण्याची तरतूद, बहुमताचे सरकार असण्याची! परंतु घटनात्मकता, विधानसभा कामकाज अधिनियम वगैरे विषयात नवनिर्वाचित आमदारांना गम्य नाही. याचाच फायदा घेऊऩ मतविभाजन अमलात आणण्याच्या भानगडीत न पडता निव्वळ आवाजी मताने विश्वासनिदर्शक ठराव संमत झाल्याचे घोषित करण्यात आले.

अधिक वाचा:‘सतित्वा’चा भंग नव्हे!