विशेष लेख

शांती कुठे असते...

शांती कुठे असते... 

रश्मी महांबरे

सगळं इथंच ठेऊन जायचं असत तरी का -- प्रत्येक गोष्टीची जमवाजमव करतो मनुष्य ???

एक पीन हरवली तरी बेचैन होतो आणि मोठा ऐवज हरवला तर वेडापीस। होतो ...

खरंच इतक्या आवश्यक असतात का ह्या सगळ्या गोष्टी ???

अशक्यच असत का जगण या सगळ्या गोष्टी जमवल्या शिवाय ???

की जगण सुसह्य होण्यासाठी असते ही जमवाजमव???

अधिक वाचा:शांती कुठे असते...

सुका पाऊस…

सुका पाऊस 

रश्मी महांबरे

खरं तर आज  मुसळधार पाऊस पडत होता... अगदी सकाळ पासूनच झाकोळलं होतं .. तेव्हा लेकीला शाळेत सोडायला जायचे होते... निघाले आणि पुरती भिजले.  

पावसात भिजणं मला नेहमीच आवडत.  कंपनी असेल तर अधिकच मजा पण कुणी नसलं तरी एकटीनं भिजण्याचा आनंद काही कमी नाही. मुद्दाम छत्री किंवा रेनकोट विसरून,  काही काम करून येताना...  भिजत घरी येण किंवा विनाकारण भिजायला जाणं  मला फार्..र  आवडत.  थंड वाऱ्यात .. पावसाच्या माऱ्यात आपण पुरते धुऊन निघालो आहोत.. शुद्ध झाले आहोत अस वाटत.

अधिक वाचा:सुका पाऊस…

जपून जपून शब्द.................!

जपून जपून शब्द.................!

रश्मी महांबरे, मुंबई

मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि म्हणूनच त्याला बोलायला आवडतं. इतरांशी संवाद साधायला आवडतं. इतर सर्व प्राण्यांपेक्षा त्याचं एक खास वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे 'वाचा'. आपल्या भावना त्याला शब्दातून व्यक्त करता येतात. खरं तर, हे त्याला मिळालेला वरदान आहे. पण मनुष्य त्याचा बऱ्याचदा अमानुषपणे वापर करतो. आवश्यक त्या ठिकाणी न बोलणं हे जसं घातक आहे तसंच अनावश्यकपणे अति बोलणं देखील घातकच आहे.

अधिक वाचा:जपून जपून शब्द.................!