विशेष लेख

प्रकल्पग्रस्तांना वेळेवर न्याय कसा मिळेल

प्रकल्पग्रस्तांना वेळेवर न्याय कसा मिळेल

ड.प्रभाकर येरोळकर, लातूर
9860455785

धरणामध्ये किंवा तत्सम प्रकल्पांमध्ये शेतकर्‍यांच्या जमिनी सरकारकडून संपादित केल्या जातात. आपल्याकडील कायदे हे बहुतांशी ब्रिटिश काळात तयार झालेले आहेत आणि शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भातली एकूणच प्रक्रिया ज्या कायद्यान्वये चालते तो भूसंपादन कायदादेखील अपवाद मुळीच नाही. 

अधिक वाचा:प्रकल्पग्रस्तांना वेळेवर न्याय कसा मिळेल

खरी दिवाळी गावाकडचीच!

खरी दिवाळी गावाकडचीच!

ड.प्रभाकर येरोळकर, लातूर
9860455785

आपल्या अनुभवातून जीवनाचा अर्थ काढणे, सर्वसामान्य निष्कर्ष काढणे किंवा जीवनाविषयक तत्त्वज्ञान मांडणे ही माणसाची सहजप्रवृत्तीच असते. या थोर लेखक गंगाधर गाडगीळ यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. सध्या साजरी होत असलेली दिवाळी आणि सत्तरच्या दशकातली दिवाळी यात जमीन-अस्मानचे अंतर पडले आहे. आपल्याकडे सतत कुठला ना कुठला उत्सव चालू असतोच, मात्र या उत्सवाचा आण ग्रामीण संस्कृतीचा निकटचा संबंध असतो हे आता आपण ध्यानातच घेत नाही. आपल्याला काय रोजच दवाळी आणि दसरा असे बोलून झाले की, जबाबदारी संपली. पण असे होत नसते. आमच्या लहानपणी दिवाळीला गावाकडे जाणे बंधनकारक असे. कित्येक काय परंतु वर्षानुवर्षे ही परंपरा चालूच होती. दिवाळीचा अर्थच मुळी तो असायचा. घरातीलच नव्हे तर गावातीलही सगळ्यांनी एकत्र जमायचे. माणसे नोकरी, व्यवसायानिमत्त कुठेही असली तरी दिवाळीला गावाकडे जमत. कुणाच्या घरी कोण आले, कोण आले नाही याची खबरबात सगळ्यांना असे. त्यावेळी मोबाईल, फोन्स नव्हते. मात्र एकाच्या घरातली बातमी दुसरीकडे समजण्याची एक नव्हे तर अनेक माध्यमे उपलब्ध होती. आणि ती सारी जीवंत होती; एकतर सकाळी उठल्याबरोबर जंगमलोक रोज पीठ मागायला येत. लहान असतानाचे मला चांगले आठवते. सकाळी तासभर मी पीठ वाढायच्याच कामावर बसलेला असे. एखाद्या दिवशी ते आले नाहीत तर आमची आजी अस्वस्थ व्हायची. कारण गावात हमखास कुणी तरी गचकलेले असायचे. दिवाळीत कोण आले, कुणाच्या घरी कोण नाही अशी जंगम चौकशी करीत असे.

अधिक वाचा:खरी दिवाळी गावाकडचीच!

सिंहस्थ कुंभमेळा एका महाइव्हेंन्टची यशस्वी सांगता

सिंहस्थ कुंभमेळा एका महाइव्हेंन्टची यशस्वी सांगता

नाशिक  - त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे मोठा पर्वकाळ. या काळात देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक शाही स्नानासाठी जमणार. त्यांना किमान प्राथमिक सुविधा देण्याचे अतिशय अवघड असे कार्य नाशिक जिल्हा प्रशासनाने केले. अडीअडचणी आल्या असतील पण कुठेही कमीपणा जाणवला नाही. अत्यंत सुसूत्रबध्दपणे या सिंहस्थातील सर्व शाही स्नानाचे कार्यक्रम संपन्न झाले. म्हणूनच हा सिंहस्थ कुंभमेळा एक स्वच्छ कुंभमेळा म्हणून भाविकांमध्ये चर्चेत राहिला.

नाशिक येथे दि.२९ ऑगस्ट, १३ सप्टेंबर व १८ सप्टेंबर तर त्र्यंबकेश्वर येथे २९ ऑगस्ट, १३ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर अशा शाही स्नानाच्या पर्वण्या असल्याने सर्वत्र प्रशासनाची जय्यत तयारी. पहिल्या शाही स्नानाच्या वेळी बंदोबस्त काहीसा कडक असल्याने भाविकांची संख्या थोडी कमी वाटली. मात्र त्यापुढील शाहीस्नानांचा लाखो भाविकांनी आनंद घेतला. अगदी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचे हे स्नान खऱ्या अर्थाने "शाही लोकशाही स्नान" ठरावे इतपत यशस्वी झाले. अगदी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी देखील संपूर्णत: या सर्व कार्यक्रमात उपस्थितीती दर्शवून लाखो भाविकांना शासन त्यांच्या सोबत असल्याची साक्ष दिली.

१३ सप्टेंबरच्या पर्वणी आधी म्हणजे १२ सप्टेंबरला शनिवार व अमावस्या तसेच पोळा हा सण होता. तरीही दिवसभर भाविकांची गर्दी झाली. रामघाटासह नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील सर्वच घाटांवर स्नानादी कर्म भाविकांनी सुरू केले. १३ तारखेच्या पहाटे २ पर्यंत सर्वसामान्य भाविकांना रामघाटावर प्रशासनाने मनमुरादपणे स्नानाचा आनंद उपभोगू दिला. तद्नंतर मात्र, साधूजनांच्या शाही स्नानाची तयारी सुरू झाली आणि रामघाट रिकामा करण्यात आला. सर्व साफसफाईनंतर पहाटेपासून सुरू होणाऱ्या शाही स्नानासाठी रामघाट व त्र्यंबक येथील कुशावर्त आणि प्रशासन सज्ज झाले.

कोटींची कोटी

पहिल्या पर्वणीनंतर लोकांची गर्दी निश्चित वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाने ठेवली होती. त्यामुळे सर्व सुविधा देण्याची तयारीही झाली. आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त भाविक आले, अशी मनमोकळी प्रतिक्रिया पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेतच दिली. अगदी लोकांच्या संख्येचाच विचार केला, तर ही संख्या कदाचित कोटीपर्यंत जाईल, अशी कोटीही त्यांनी केली. प्रशासनाने अत्यंत दक्षतेने तसेच सुसज्ज राहुन काम केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. येणाऱ्या भाविकाला कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. अतिशय आनंदाने या पर्वकाळात सर्वत्र शाही स्नानाचा आनंद घेतला. आलेले सर्व भाविक खूश आहेत, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कोटींच्या संख्येत ज्यावेळी एखाद्या ठिकाणी गर्दी होते त्यावेळी काही घटना दुर्घटना होण्याचा संभव असतो. पण या संभाव्य घटनांचा विचार करुन प्रशासन खंबीरपणे आपली पूर्वतयारी ठेवते त्यावेळी दूर्घटनांना वाव राहत नाही याचा प्रत्यय नाशिकच्या या कुंभमेळ्याने परत एकदा आला. आरोग्य, महसूल, महानगरपालिका, स्वच्छता, पोलीस, स्वयंसेवक, सेवाभावी संस्था, माध्यमे, अशा सर्वच घटकांनी एकत्र येऊन हा सिंहस्थ येणाऱ्या भाविकांसाठी सुखदायी केला. ही बाब खरोखरच अभिनंदनीय आहे.

स्वच्छ कुंभमेळा

माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आदेशानुसार या कुंभमेळ्यात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले. स्वच्छतेसाठी महानगरपालिका व संबंधित विभागांनी विविध उपाययोजनांद्वारे शहरात व गोदावरी नदी व परिसरात स्वच्छता ठेवली. याचा प्रत्यय प्रत्यक्षात सर्व भागात फिरत असताना येत होता. एकूणच स्वच्छ कुंभमेळा करण्यामध्ये प्रशासन यशस्वी झाले, असे म्हणण्यास हरकत नाही. तसेच पोलिस विभागामार्फतही अतिशय चोख बंदोबस्त असल्याचे दिसत होते. केवळ बंदोबस्तच नव्हे, तर रामघाटावर प्रत्यक्ष गोदावरी नदीत उतरून भाविकांचे पाण्याच्या प्रवाहात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी संरक्षण केले. ही बाब सर्व भाविकांना आवडली. तसेच या पर्वणीत शाही स्नानाचा आनंद घेत असताना इतरांनाही संधी मिळावी यासाठी देखील ही मंडळी सर्व भाविकांना आवाहन करत घाटावर गर्दीचे नियंत्रण करीत असताना दिसून आले. कोणतीही दुर्घटना न होता हा दिवस पार पडला. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या अभिनंदनाची, तर आहेच त्याशिवाय येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे सहकार्य व त्यांचा सहभाग उत्तम राहिला म्हणूनच नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची यशस्वी सांगता झाली असे म्हणता येईल.

माध्यमांची मदत

एकूणच हा सिंहस्थ कुंभमेळा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी सर्वच माध्यमांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. त्यामुळे घरबसल्याही आपण या शाही स्नानाचा आनंद मिळवू शकलो. मल्टीमिडियाच्या सहाय्याने नाशिक तथा त्र्यंबक येथील या सिंहस्थाने प्रक्षेपण विविध वाहिन्यांच्या मार्फत जगभरात करण्यात आले. तर नाशिकचे विभागीय उपसंचालक सतीश लळीत यांच्या मार्गदर्शनात दोन्ही ठिकाणी तसेच नाशिक येथील साधु ग्राम परिसरातही माध्यम प्रतिनिधींना प्रसारणासाठी सोय व्हावी याकरीता सर्व अत्याधुनिक यंत्रणेसह माध्यम कक्ष सुसज्ज ठेवण्यात आले. त्याचा उपयोग देश विदेशातील माध्यम प्रतिनिधींनी घेतला आणि लोकांपर्यत हा सिंहस्थ कुंभमेळा पोहचविला.

या कुंभमेळ्याच्या यशासाठी निश्चितच नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले, नाशिक म.न.पा. आयुक्त डॉ.प्रविण गेडाम, पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन, नाशिक जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आणि त्यांचे सहकारी अधिकारी-कर्मचारी यांनी केलेले श्रम कारणीभूत आहे. त्या सर्वांचे विशेष अभिनंदन व आभार.