विशेष लेख

चॅनेलवाले कधी सुधारणार?

सचिन तेंडुलकरला राज्यसभेवर नियुक्ति मिळाली. आणि ईलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनेल्सना अक्षरश: चेव आल्यासारखचं झालं होतं. चर्चेला उत आला होता. तेंडुलकर या वरिष्ठ सभागृहात नेमकं काय करील? आता किक्रेट तरी खेळणार नाही, एवढी साधी समजही कुणाच्या लक्षात राहिली नाही. कपिलदेव, अझरुद्दीन, किर्ती आझाद अशा माजी किक्रेटर्सना चर्चेत सामिल करुन घेण्याची एकच चढाओढ लागली. सचिनची वेळ चुकली का? याच मुद्द्यावर मग गप्पा सुरु झाल्या. तेंडुलकरचं किक्रेटच्या मैदानावरलं टाइमिंग कस परफेक्ट असतं; तसंच ते राज्यसभेतही असणार; असा सूर कांही जणांनी लावला. पण राज्यसभेतले कामकाज कसे चालते, याची सूतराम कल्पना नसणा-यांकडुन दुसरी कूठली चर्चा अपेक्षिणार? सचिनच्या आधी चॅनेल्सवर कुठली चर्चा चालू होती, तर नुपूर तलवारला जमानत नाकारल्याच्या बातमीवरुन. गंमत म्हणजे आमचे चॅनेलवाले कधी सुधारणार? याच विषयावर खरं तर चर्चा व्हायला हवी.

अधिक वाचा:चॅनेलवाले कधी सुधारणार?

हक्कानी नेटवर्कला अमेरिकेने 'मोस्ट डेंजरस' जाहीर केले

जगात सर्वोच्च समजल्या जाणा-या नोबेल पारितोषिक विजेत्यांमध्ये यहुदींचे बहुमत आहे. याचप्रकारे स्वहस्ते न करता दुस-याच्या खांद्यावर बंदूक ठेवून अपकृत्य घडविण्याच्या बाबतीत जी पारितोषिक  वा बक्षिसे द्यायची झाली तर त्यात अमेरिका नोबेल पारितोषिक पटकाविणा-या यहुदींच्या संख्येच्या मागे राहू शकणार नाही. ज्या ९/११च्या घटनेला अल् कायदा ही दहशतवादी संघटना जबाबदार होती त्याची निर्मिती अमेरिकेचीच होती. अमेरिकेने निर्माण केलेल्या या भस्मासुराने शेवटी जागतिक व्यापार केंद्राला आणि पर्यायाने अमेरिकेच्या अब्रुलाच भक्ष्य केले. आता शेवटची बातमी अशी आहे की, अमेरिकेने पाकिस्तान स्थित कुख्यात हक्कानी समूहाला दहशतवादी जाहीर केले आहे; एवढेच नव्हे तरसेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए)च्या हिटलिस्टवर अग्रक्रमावर ठेवून अल् कायदानंतर आता हक्कानीला संपविण्याचा ठाम निश्चय केला आहे. आज अमेरिकेला जो हक्कानी समूह भयंकर आणि मानवजात व जगाच्या शांतीसाठी  धोकादायक वाटत आहे त्या हक्कानीला दोम दशकापूर्वी अमेरिकेनेच थोपटले होते. ९/११चा स्मृतीदिन जवळ आला असताना अमेरिकेने हक्कानीच्या 'शूट ऍट साईट'चा कडक आदेश जारी केला होता याचा सूचितार्थ मोठाआहे आणि त्यातील काही भाग भारतासाठी परिणामकारक ठरण्यासारखा आहे.

अधिक वाचा:हक्कानी नेटवर्कला अमेरिकेने 'मोस्ट डेंजरस' जाहीर केले