विशेष लेख

मिडीया आणि संसद, दोन्ही कडूनही लोकांचा अपेक्षाभंग!

मिडीया आणि संसद, दोन्ही कडूनही लोकांचा अपेक्षाभंग!

ड.प्रभाकर येरोळकर, लातूर
9860455785 

संसदेचे आणि विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होऊन आठवडा लोटला तरी कामकाज लोकांच्या हिताचे काय झाले हे सांगणे अवघड, अशी एकूण स्थिती आहे. एक नमुना बघा. पाकिस्तानच्या सीमेजवळील गुरूदासपूर येथील एका पोलीस ठाण्यावर अतिरेकी हल्ला झाला. पंजाब पोलीस, एनएसजी कमांण्डो, मिलीटरीचे जवान असे सगळे मिळून तिथं जीवावर उदार होऊन अतिरेक्यांचा खातमा करीत होते. तोवरच इकडे मिडीया आणि तिकडे संसद. दोन्हीकडूनही लोकांचा अपेक्षाभंग सुरू झाला. अतिरेकी हल्ला कुठे झाला की चॅनेलवाल्यांना तर अक्षरश: चेवच येतो. कमालीची बेताल वागतात आपली माध्यमे. पोलीस आणि सुरक्षा दले आपले काम बजावत असताना माध्यमांनी त्यांचे जीवंत चित्रण दाखविण्याचा सबसे तेज प्रयत्न करणे कितपत योग्य? काही काय सगळ्याच वाहिन्या यावेळी आम्ही अतिरेकी हल्ल्याचे प्रसंग डायरेक्ट दाखवित नसून तुम्हाला दिसणारी दृष्ये ही काही तासाआधाची आहेत, अशी एक ओळ खाली दाखवित होत्या. परंतु तातडीने दहशतवादी हल्ला झालेले ठिकाण, ती जागा, नेमके स्थान, पोलिसांच्या हालचाल हे सारे दाखविणे यातून सामान्य जनतेला काय मिळणार? उलट अशा माहितीचा उपयोग अतिरेक्यांनाच होतो. आणि ते अधिक शहाणे होऊन पुढील कार्यक्रम आखतात. वेनसडे नावाच्या हिन्दी चित्रपटात या प्रकारावर चांगलाच प्रकाशझोत टाकलेला आहे. मुंबइतल्या ताज हॉटेलवरील अतिरेकी हल्ल्यावेळीही असाच प्रकार घडला. चॅनेलवाल्यांच्या अति उत्साही अतिरेकीपणामुळे दहशतवाद्यांचेच फावले. शेवटी हे सारे लक्षात आल्यावर ते प्रक्षेपण थांबविले गेले. आताही चॅनलवाले दिवसभर चेकाळून जाऊन ती-तीच द्रष्ये दाखवित राहणार आणि चर्चेचा निर्थक काथ्याकुट करीत राहणार यात शंका नाही.

देशहिताच्या दृष्टीने माध्यमावर काही बंधने असावयास हवीत, असे आता सगळ्यांनाच वाटू लागले आहे. आणि भविष्यात तसे काही झालेच तर आश्‍चर्य वायू नये. तिकडे संसदेत काही वेगळे घडत नव्हते. आठवडा लोटला तरी संसदेतले कामकाज काही सुरळीत नव्हते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि भाजपाच्या दोन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधक आडून बसल्याने कामकाजाचा पत्ताच नाही.

अधिक वाचा:मिडीया आणि संसद, दोन्ही कडूनही लोकांचा अपेक्षाभंग!

'‘अच्छे दिन’' येण्यासाठी पंचवीस वर्षे?

'‘अच्छे दिन’' येण्यासाठी पंचवीस वर्षे?

ड. प्रभाकर येरोळकर, लातूर
9860455785 
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा; ‘
अच्छे दिन’ येण्यासाठी पंचवीस वर्षे लागतील अशा अर्थाचे एक वाक्य म्हणाल्याची बातमी मिडीयातून झळकू लागली, यामुळे अनेक लोकांच्या छातीत धडकीच भरली. मात्र उर्जामंत्री गोयल यांनी लगोलग स्पष्टीकरण दिले आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. हे ‘अच्छे दिन’ येण्याची सगळ्यात जास्त घाई काँग्रेसवाल्यांनाच झालीय. सामान्य जनता मात्र पाच वर्षे होईतो थांबावयास तयार आहे. परंतु हे पंचवीस वर्षांचे गणित; म्हणजे अतिच झाले. मात्र भाजपाकडुन आलेल्या स्पष्टीकरणाने हा काळ बराच मागे आणला. गोयल यांच्या म्हणण्यानुसार पंचवीस वर्षांचा काळ या करीता लागणार आहे की, तो संपताक्षणीच भारत हा संपूर्ण जगात विश्‍वगुरू म्हणून मान पावेल. सगळे विश्‍व हे आमच्या पायावर लोटांगण घालेल.

अधिक वाचा:'‘अच्छे दिन’' येण्यासाठी पंचवीस वर्षे?

अच्छे दिन.. बुरे दिन!

अच्छे दिन.. बुरे दिन!

ड. प्रभाकर येरोळकर, लातूर
9860455785

प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊन वर्षपूर्ती झाली. हा कालावधी तसा खूप छोटा आहे. परंतु विरोधी पक्षांनी, ज्यात कॉंग्रेसही आहे. काही आक्षेप घेण्यापूर्वीच भाजपाने मोठ्या प्रमाणावर या वर्षपूर्तीचा गाजावाजा सुरू केला. एकप्रकारे मार्केटिंग पण 'इंडिया शायनिंग'चा अनुभव पाहता ती कितपत फलदायी ठरेल, ते येणारा काळच ठरवेल. ज्या अपेक्षेने लोकांनी या सरकारला निवडून दिलेय, त्या पूर्ण होण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी देण्यास लोक तयार आहेत. पण इकडे सत्ताधारी पक्षालाच घाई झालेली दिसतेच. त्यापेक्षा शांतपणे लोकोपयोगी निर्णय घेत कामे करीत राहिले तर लोक निश्‍चित दखल घेतात. जसे मनमोहन सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या काळात झाले.

अधिक वाचा:अच्छे दिन.. बुरे दिन!