पुस्तक परिचय

समाज प्रबोधनात्मक विचारांचा प्रकाश देणारा कवितासंग्रह : काळोखातील प्रकाश

कविता हा साहित्य प्रकारातील एक महत्वाचा प्रकार आहे. कमीतकमी शब्दांत जास्तीतजास्त आशय सांगणारा, भावनाशील मन उलगडणारा कविताहा प्रकार साहित्यातील एक अलंकार आहे असे मला वाटते. संवेदनशील मनात कवितेचं फूल हे आपसूकच उमलतं.

कवी नरेंद्र अमृतराव वाकोडे हे अतिशय संवेदनशील मनाचे आहेत, हे त्यांच्या कवितासंग्रहातून दिसून येते. म्हणूनच त्यांच्या भावविश्वातून ह्या कविता फुलल्या. स्वतः अंध असूनही सगळीकडे अंधारच दिसत असूनही त्यांनी त्यांच्या कवितांमधून उदबोधक, समाज प्रबोधनात्मक विचारांचा प्रकाश समाज मनात उजळण्याचे पवित्र कार्य काळोखातील प्रकाशया कवितासंग्रहाच्या माध्यमातून केलेले आहे.

अधिक वाचा:समाज प्रबोधनात्मक विचारांचा प्रकाश देणारा कवितासंग्रह : काळोखातील प्रकाश

स्त्री भृणाचा आक्रोश मांडणारा काव्यसंग्रह - आक्रोश लेखणीचा

‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ असे म्हटले जाते. शब्द कवीला स्वस्थ बसू देत नाहीत. म्हणून शब्दाला शब्द जोडत गेले की, कविता निर्माण होते असे ही नाही. शब्दाला आकार देत आशय सौंदर्याचं नवं शिल्प घडविण्याचं काम कवीला करावं लागतं. कविता लिहिण्यास प्रारंभ केल्यावर प्रत्येक कवी प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलण्यासच प्रथम प्राधान्य देतो. अनामिक प्रेयसीला, सखीला मनात साठवून शब्दकुंचल्याने तिचे चित्र रेखाटण्यातच धन्यता वाटू लागते. प्रेम या अडीच अक्षराच्या वर्तुळातच तो फिरू लागतो. वर्तुळाच्या परिघाबाहेरही जग आहे याची जाणीव जेव्हा त्याला होते तेव्हा समाज मनाला गृहीत धरून अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे, समाज प्रबोधन करण्याकडे त्याचा काळ दिसू लागतो. प्रेयसीच्या प्रेमात ‘सैराट’ झालेल्या मनामध्ये समाज जागृतीची ‘झिंग’ आणण्याचे काम करणे हे म्हणावे तितके सोपेही नसते. पण ही झिंग चढली की, ‘झिंगाट’ झालेले कवी मन ‘तराट’ होवून एकेका विषयांवर, प्रश्नांवर आसूड ओढू लागते. समाजातील सलणा-या विकृतींवर फटके मारत घोंगावणा-या भयाण वादळाला थोपविण्याचे, शांत करण्याचे प्रयत्न करू लागते.

 

अधिक वाचा:स्त्री भृणाचा आक्रोश मांडणारा काव्यसंग्रह - आक्रोश लेखणीचा

विश्वचि माझे घर म्हणजेच ब्रम्हविलासांचा प्रासादिक शब्दrविलास

श्री. ब्रम्‍हविलास पाटील (जयसिंगपूर) यांनी, ज्‍योतिषशास्‍त्राचा अभ्‍यास चांगला केला आहे. याबरोबरच धर्मज्ञानाचेही सम्‍यग्ज्ञान त्‍यांना आहे. या दोन्ही शास्‍त्रासंबंधी त्‍यांनी आपल्‍या ‘विश्वचि माझे घर’’, या पुस्‍तकाविषयी सुयोग्‍य लेखन केले आहे. तसेच डॉ. सुनील दादा पाटील (जयसिंगपूर) यांनी, आपल्‍या सुप्रसिध्द ‘कवितासागर प्रकाशन’ संस्‍थेतर्फे या पुस्‍तकाची उत्तम छपाई करून प्रकाशन केले. त्‍याबद्दल सुविद्य लेखक ब्रम्हविलास पाटील आणि कर्तव्यदक्ष प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील, या उभयतांना मी मनापासून धन्यवाद देतो.

अधिक वाचा:विश्वचि माझे घर म्हणजेच ब्रम्हविलासांचा प्रासादिक शब्दrविलास