पुस्तक परिचय

मनमंदिर

‘‘मनमंदिर’’

लेखक अॅड.विलास नार्इक

अॅड.विलास नार्इक हे गेली अनेक वर्षे किली व्यवसायात आहेत. शिवाय ते पत्रकारिता, राजकीय पक्ष संघटन, सामाजिक उपक्रम, उत्तम वक्ता अशा विविधांगी क्षेत्रात व्यग्र असतानाच साहित्यिक या नव्या क्षेत्राने त्यांना खुणावले, नव्हे हेच तर त्यांचेरे क्षेत्र आहे हे आता सिध्द झाले आहे.

ष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या अॅड.विलास नार्इक यांचे मराठी साहित्यक्षेत्रात दमदार पाल पडले आणि ‘‘एक ना धड’’, ‘‘कळतनकळत’’, ‘‘जीवन सुगंध’’ अशा दर्जेदार साहित्याची त्यांनी निर्मिती केली. ‘‘एक ना धड’’ या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला अनेक साहित्य पुरस्कार मिळाले. इतकेच नव्हे तर या पुस्तकाचा समावे महाराष्ट् शासनाच्या ग्रंथसूचित झाला आहे.

आता अॅड.नार्इक यांचे ‘‘मनमंदिर’’ हे चौथे पुस्तक (कथासंग्रह) नुकतेच एका दिमाखदार सोहळ्यामध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकरुपी मनमंदिरात वाचकाने एकदाका प्रवेश केला की, तो त्या कथांमध्येच रममाण होतो. इतक्या त्या वैविध्य आणि उत्तम कथा लेखकाने दिल्या आहेत. मनाला नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवणे यालाच जगणं म्हणतात. असे जगणं आपण या कथा वाचनातून अनुभवतो, इतका हा कथासंग्रह प्रभावशाली झाला आहे.

मनमंदिरमधली सुरुवातीची कथा नारळाच्या झाडावरुन माडी-निरा काढणार्‍या पाडेकर्‍याची आहे. नारळाच्या झाडावर उंच उंचचढून जाणाऱ्या दत्तूला जीवनातील समाधानाची उंची कधीच गाठता येत नाही, हे वास्तव अॅड.विलास नार्इक यांनी ‘दत्तू भंडारी’ या कथेतून दाखविले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी जीवावर उदार होन कसे आणि किती परिश्रम करावे लागतात, याचे भेदकच़ित्रण लेखकाने यात केले आहे.

मातृत्व अशक्य असल्यामुळे उच्चपदावरील सनदी अधिकारी व त्यांची पत्नी मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतात आणि तरीसुध्दा अनाथ मूल आणायला पत्नी तयार होत नाही, तर विचारांशी तडजोड करायला पती तयार नसतो, अशा कथानकाव्दारे वेडी-वाकडी वळणं घेत जागणाऱ्या पती-पत्नीच्या आयुष्याचा आलेख त्या दोघांतील अस्वस्थ करणाऱ्या संवादाने लेखकाने ‘सूत्रधार’ या कथेत मांडला आहे. ‘गळफास’ या कथेतून महिलेच्या गळफासावियीच्या पोलिस तपास कामाचे वर्णन करतानाच तपास करणारा पोलिस, सरकारी वकील, न्यायाधीश यांच्यातील प्रश्नोत्तरांनी वाचकाला आपण कोर्टातच असल्याचा भास होतो. या कथानकात गुंतवून ठेवण्याचे लेखकाचे कसब दिसून येते.

सुप्रिया नावाच्या मुलीचा विवाह एका अतिसुशिक्षित आणि श्रीमंत घराण्यातील मुलाशी होतो, पण त्या घरात तिला सुख मिळत नाही, तिच्या माहेरचा उध्दार होतो, ती केवळ एक निर्जीव वस्तू बनून राहते आणि ही मन हेलावून टाकणारी व्यथा तिची लग्न न झालेली सखी प्रिया आपल्या भावाला सांगते.

समीक्षण - नंदकुमार डोळस