पुस्तक परिचय

साहित्यविश्व दिवाळी

साहित्यविश्व दिवाळी -  मानसी कवळे अलिबाग,

 

दिवाळीचा सण म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती नानाविध खाद्यपदार्थांची रेलचेल, विविधरंगी, विविधढंगी फटाके, सुंदर व आकर्षक रांगोळ्या, कपड्यांच्या बाजारपेठा आणि या सर्वांच्या जोडीला बौध्दिक खुराक पुरविणारे दिवाळी अंक! अतिशय प्रगत अशा वर्तमान शतकात वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होत चाललेल्या समाजाला प्रदूषण निर्माण करणारे फटाके निरर्थक वाटू लागले आहेत; मात्र दिवाळी अंकाचे महत्व आणि आवश्यकता दिवसेंदिवस वाढत चालल्याचे जाणवते. मुंबई शेजारील जिल्हा म्हणून ज्या रायगडचा उल्लेख होतो, त्या रायगडमध्ये अनेकविध दिवाळी अंक पाहायला मिळतात. अर्थातच, वाचकांची मागणी पुरविण्याचे आवाहन असल्यानेच नवनवीन अंकांचा जन्मा होतोय. या सर्व दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत आपले वेगळेपण जपणारा, कुणाकडून काही घेण्यापेक्षा वाचकांना भरभरुन देण्यातच धन्यता मानणारा एक दिवाळी अंक चटकन नजरेत भरतो, 'साहित्यविश्व २०१५'!

अधिक वाचा:साहित्यविश्व दिवाळी

मनमंदिर

‘‘मनमंदिर’’

लेखक अॅड.विलास नार्इक

अॅड.विलास नार्इक हे गेली अनेक वर्षे किली व्यवसायात आहेत. शिवाय ते पत्रकारिता, राजकीय पक्ष संघटन, सामाजिक उपक्रम, उत्तम वक्ता अशा विविधांगी क्षेत्रात व्यग्र असतानाच साहित्यिक या नव्या क्षेत्राने त्यांना खुणावले, नव्हे हेच तर त्यांचेरे क्षेत्र आहे हे आता सिध्द झाले आहे.

अधिक वाचा:मनमंदिर

'ज्ञाना तु का एक; चोख व मुक्त'

ड. प्रभाकर येरोळकर, लातूर 

9860455785

 

संताचिये पायी हा माझा विश्‍वास।
सर्व भावे दास झालो त्यांचा।।

एकदा का संत सेवेचा आनंद मिळू लागला की, माणसाला आपले हित कळू लागते आणि माणसाचे हित कशात तर परमेश्‍वर परमात्मा याची प्राप्ती करून घेण्यात. कारण तो तर जीवनाचा मूळ आणि अंतिम उद्देश असतो. हे विचार आहेत, बंडोपंत दि. कुलकर्णी यांचे. ते न्यायक्षेत्रात न्यायाधीश म्हणून कार्यरत असून बारावी पावतोचे त्यांचे शिक्षण कर्नाटकातील बसवकल्याण तालुक्यातील उजळंब येथे झाले, हे आणखी एक विशेष!
बंडोपंतांनी नुकतेच 'ज्ञाना तु का एक; चोख व मुक्त?' हे पुस्तक मराठीत लिहिले असून संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम, एकनाथ, संत चोखा मेळा आणि मुक्ताबाई या संतांच्या रचनेपैकी काही निवडक अभंग घेऊन त्यावर सर्वांना समजेल अशा भाषेत निरूपण केलेले आहे. लेखकाचे वैशिष्ट्य हे की, तुम्ही दिवसाच्या कुठल्याही प्रहरी त्यांची भेट घेतली तर ते सतत संतांच्या, संत साहित्याच्या प्रभावाखाली असल्याचे जाणवते.

अधिक वाचा:'ज्ञाना तु का एक; चोख व मुक्त'