पुस्तक परिचय

'अपना स्ट्रीट'चे ते मंतरलेले दिवस

ड. प्रभाकर येरोळकर, लातूर 

9860455785

२०११ सालामध्ये पुण्याच्या अमेय प्रकाशनाने 'अपना स्ट्रीट' हे पुस्तक इंग्रजीतून प्रकाशित केले. आपल्या सांस्कृतिक अनुभवाच्या परिघाबाहेर देखील काही गोष्टी असतात. 'अपना स्ट्रीट' हे पुस्तक अशाच गोष्टींची ओळख आपल्याला करून देते. ज्युलियन क्रँडाल हॉलीक, हे दृकश्राव्य माध्यमाशी निगडित असे लेखक असून त्यांनी नॅशनल पब्लिक रेडिओ (अमेरिका) बीबीसी रेडिओ ४ आणि वर्ल्ड सर्व्हिस, सीबीसी (कॅनडा) आणि एबीसी (ऑस्ट्रेलिया) यांचेसाठी गेल्या पंचवीस वर्षांत भारताबद्दल रेडिओ डॉक्युमेंटरीज रेकॉर्ड करून तयार केल्या आहेत. रेडिओ मिड डे (मुंबई) यांच्यासाठी अमेरिकेहून ते साप्ताहिक वृत्त प्रसारित करीत तर टाइम्स ऑफ इंडिया आणि द हिंदूमध्ये नियमित स्तंभलेखक म्हणूनही त्यांनी काम केले. भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये त्यांचे वास्तव्य असते.

अधिक वाचा:'अपना स्ट्रीट'चे ते मंतरलेले दिवस

जीवन सुगंध

जीवन सुगंध

- नंदकुमार डोळस

‘‘जीवन सुगंध’’ हे अॅड.विलास नार्इक यांचे तिसरे पुस्तक प्रकाशित झाले आहे. परिश्रमपूर्वक उभारलेल्या एखाद्या बगीच्यात प्रवेश केल्यानंतर तेथील हिरवळ, विविध प्रकारच्या रंगांतील अनेक आकारांच्या आणि प्रकारांच्या पानाफुलांच्या सानिध्यात आपण सर्वकाही विसरुन रममाण होतो, आनंद घेतो, असाच अनुभव अॅड.विलास नार्इक यांनी जीवनातील विविध पैलूंनी फुलविलेल्या जीवन सुगंधरुपी बागेतल्या अंतरंगात शिरल्यानंतर येतो. अनुभवलेल्या गोष्टीत लपलेली कथाबीजं लेखकाने या पुस्तकात फुलविली आहेत त्या वाचकांना गुंतून ठेवणाऱ्या आणि त्यातून एक वेगळाच वाचनाचा आनंद देणाऱ्या आहेत.

 

अधिक वाचा:जीवन सुगंध

टागोरांचे भावविश्व उलगडणारी मराठी कादंबरी 'गुरुदेव'

रवींद्रनाथ टागोर हा जगातील एकमेव असा कवी आहे, ज्याची गीते दोन देशांत राष्ट्रगीत म्हणून गायिली जातात. नामदेवांनंतर ज्यांचे गीत एखाद्या धर्मग्रंथाचा भाग बनावे असे भाग्यही त्यांना मिळाले. नोबेल पुरस्कार मिळालेला हा भारतातील एकमेव कवी. कविता, नाटक, कथा, कादंबरी या साहित्याच्या विश्वात चौफेर वावरणारा लेखक, संगीताच्या क्षेत्रातही अजरामर कामगिरी करून गेला. रवींद्रनाथांच्या नावाने ओळखले जाणारे 'रवींद्र संगीत' ही रवींद्रनाथ टागोरांनी भारतीय संगीताला दिलेली फार मोठी देणगी आहे. साहित्य, संगीताच्या बरोबरीनेच चित्रकलेल्या क्षेत्रातही रवींद्रनाथांनी भरीव आणि उल्लेखनीय काम केले आहे. विविध कलांच्या जगात मनमुराद विचरणारी ही व्यक्ती, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात देखील आघाडीवर होती. बंगालच्या फाळणीच्या विरोधात रवींद्रनाथ ठाकूर रस्त्यावर आले. त्यांचे महात्मा गांधींशी निकटचे संबंध होते. शांतीनिकेतनात त्यांनी शिक्षणाचे अभूतपूर्व असे प्रयोग केले. विश्वभारतीच्या निमित्ताने ते जगभर फिरले. विश्वाला गवसनी घालणा-या या कलावंताचे भावविश्व कसे होते? या प्रश्नाचे उत्तर प्रा. रंगनाथ तिवारी यांनी त्यांच्या 'गुरुदेव' या कादंबरीत दिले आहे.

अधिक वाचा:टागोरांचे भावविश्व उलगडणारी मराठी कादंबरी 'गुरुदेव'