इतर बातम्या

नागपूर : दंगल नियंत्रण पथकाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

नागपूर - विधानभवन येथे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेटवर तैनात असलेल्या दंगल नियंत्रण पथकाची पाहणी केली. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पथकाची व त्यांना देण्यात आलेल्या साधनांची माहिती दिली.पोलीस आधुनिकीकरणांतर्गत दंगल नियंत्रण पथकांना बॉडी प्रोटेक्टर साधने दिली आहेत. या साधनामुळे कुठल्याही दंगल अथवा इतर परिस्थितीत पोलिसांना दगड, काठी, बाटल्या यापासून संरक्षण मिळणार आहे.

१४ डिसेंबरला कोलाड येथे रोहे तालुका विज्ञान प्रदर्शन

नागोठणे  -  रोहे तालुका विज्ञान प्रदर्शन १४ आणि १५ डिसेंबरला कोलाड येथील कै.द.ग तटकरे माध्यमिक विद्यालयात होत असून प्रदर्शनाचे उदघाट्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आ. अनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाला  आ. धैर्यशील पाटील,आ. अवधूत तटकरे, आ. पंडित पाटील,जि.प.अध्यक्षा आदिती तटकरे,उपाध्यक्ष आस्वाद पाटील, रोहे पंचायत समितीच्या सभापती वीणा चितळकर, उपसभापती विजया पाशिलकर, जि.प.सदस्य दयाराम पवार, किशोर जैन,पं.स. सदस्य रामचंद्र सकपाळ, राजश्री पोकळे, संजय भोसले, चेतना लोखंडे, बिलाल कुरेशी, गुलाब वाघमारे, तालुका शिक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष शिवराम शिंदे, सुरेश महाबळे ,राजेंद्र पालवे,गट विकास अधिकारी बी. टी.जायभाय, पी.बी.पवार,गट शिक्षणाधिकारी एस.एल.बांगारे आदी मान्यवर यावेळी  उपस्थित राहणार आहेत. या विज्ञान प्रदर्शनाचा बक्षिस वितरण सोहळा  सभापती विना चितळकर व उपसभापती विजया पाशिलकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

साई पालखीचे नागोठणेहून शिर्डीकडे प्रस्थान

नागोठणे - येथील साईसेवक मित्रमंडळाच्या सहाव्या नागोठणे ते शिर्डी साईबाबा पालखी व पदयात्रेस आजपासून प्रारंभ झाला. सकाळी जोगेश्वरी मंदिरापासून निघालेला हा पालखी सोहळा पुढे गवळआळीतील साईबाबा मंदिरात येऊन दर्शन घेतल्यानंतर खुमाचा नाका,बाजारपेठ,शिवाजी चौक, मुंबई - गोवा महामार्गावरून वाकणमार्गे पालीकडे रवाना झाला. पालखीचे शहरात घरोघरी पूजन करण्यात आले. पालखी २० डिसेंबरला सायंकाळी शिर्डीच्या पोहोचणार असून या दरम्यान तिवरे, खोपोली, सुरज ढाबा कार्ला, तळेगाव दाभाडे (नगराध्यक्षांचे निवासस्थान), राजगुरूनगर, नारायणगाव, बोटा, चंदनपुरी - संगमनेर, कवठे कमलेश्वर आदी ठिकाणी वस्ती होणार आहे.

आज निघालेल्या या पदयात्रेत साधारणतः दीडशे साईभक्त सहभागी झाले असले, तरी दोन दिवसांत ही संख्या अडीचशे पर्यंत गेलेली असे सांगण्यात आले. या सोहळ्यात पहाटे सहा, दुपारी बारा, सायंकाळी सहा आणि रात्री दहा, अशी चारवेळा आरती तसेच भजन घेण्यात येते. २० डिसेंबरला सायंकाळी साईंचा दर्शन सोहळा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी २१ डिसेंबरला साईभक्त नागोठण्याला परतणार आहेत व २५ डिसेंबरला सायंकाळी जोगेश्वरी मंदिराच्या प्रांगणात साई भंडारा होणार आहेअसे यावेळी स्पष्ट करण्यात आले. पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष शंकर भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छिन्द्र साळुंखे, मनोज भोसले, विशाल खंडागळे, राकेश वाळंज, मनोज कोळी, सचिन वाळंज, कुणाल तेरडे, विश्वनाथ पाटील, अमित भोय, शेखर जोगत आदी पदाधिकारी विशेष मेहनत घेत आहे. 

पोलादपूर-सवाद येथील शौकत तारलेकर यांना उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार

पोलादपूर (शैलेश पालकर) - तालुक्यातील सवाद सारख्या ग्रामीण भागातील बहुजन समाजासह मुस्लीम समाजाचे कार्यकर्ते शौकत हसन तारलेकर यांना उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार खोपोली येथील राजर्षि छत्रपती शाहू महाराज सभागृहामध्ये रायगड डिस्ट्रीक्ट मुस्लीम वेल्फेअर ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या फलाही तनझीम सोहळयामध्ये प्रदान करण्यात आला. यावेळी समाजातील विविध क्षेत्र आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनादेखील मान्यवरांच्याहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

जगातील शंभरांपैकी एक मानले जाणारे मा.हसन चौगुले, उद्योजक सनाऊलाह अ.रेहमान, फलाही तनझीमचे चेअरमन मुस्तफा हाजी अहमद फौंजेकर, खतीब ए कोकण अली एम.शम्सी, भारतीय मुस्लीम परिषदेचे अध्यक्ष प्रा.हाजी जावेद कुरेशी, बदलापूरचे नगरसेवक कसून अ.सत्तार कोहरी, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी चेअरमन इरफान भुरे, तनझीमचे सेक्रेटरी जाफरखान देशमुख, खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, तनझीमचे व्हा.प्रेसिडेंट आतीफ खोत, दत्ताजी मसूरकर तसेच अन्य मान्यवर या सत्कार सोहळयाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी अली अब्दुल्ला कौचाली, हाजी अयुब तांबोळी, अस्लम सईद नाईक, मुख्तार वेळासकर, अब्दुलगनी चरफरे, इस्माईल पल्लवकर, ऍड.इस्माईल घोले, अल्लारखा सुरतीया, निसार अहमद सिलोत्री, फर्जंदअली रोग्ये, अमनुल्ला बार्डे, अब्दुलगफूर मनियार आदी सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात आला.

कुमार कदम यांचा ब्लॉग..