इतर बातम्या

पाचोरा येथील महाआरोग्य शिबीरास नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

जळगाव - ग्रामीण महाआरोग्य शिबिर रविवारी पाचोरा येथे संपन्न झालेया शिबिराचा पाचोरा व भडगाव या तालुक्यातील ग्रामीण भागातील लाखो रुग्णांनी लाभ घेतला. शिबिराच्या ठिकाणी नेत्ररोग,  मेंदू रोग, मनोविकार अनुवंशिक विकारदंताचे विकारश्वसनाचे विकारहृदयरोगलठ्ठपणाहाडांचे आजारस्त्रीरोगबालरोगप्लॉस्टिक सर्जरी तपासणीकाननाक व घसा यांचे आजारकर्करोग,  त्वचारोगमूत्ररोग या आजारांची तपासणी तसेच आयुष विभागाचा कक्ष सुरु करण्यात आले होते.  

या शिबीरात ज्या रुग्णांना सोनाग्राफीएमआरआरसिटीस्कॅनएक्सरेडुडीइकोइसीजी करण्याची आवश्यक होती अशा रुग्णांना तपासणी करण्यासाठी त्यांच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जळगाव येथे नेण्याची व आणण्याची  व्यवस्था करण्यात आली होतीतसेच ज्या  रुग्णांची शस्त्रीक्रिया करणे आवश्यक होते अशा रुग्णांना स्टिकर देण्यात आले होते.  उद्यापासून या रुग्णांच्या घरी  डॉक्टर व कर्मचारी जावून माहिती घेणार आहेतया रुग्णांचा  मुंबईपुणेनाशिकनागपूर येथील उपचाराचा सर्व खर्च मायलॉन कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून  संपन्न झालेल्या पोचारा येथील भव्य महाआरोग्य शिबीरात पाचोरा व भडगाव या तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरीकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेण्यासाठी मोठया संख्येने गर्दी केली होती.

या शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षणमंत्री  गिरीश महाजन यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आलेयावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वलाताई पाटील,उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजनआमदार हरिभाऊ जावळेआमदार चंदुलाल पटेलआमदार स्मिताताई वाघजिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकरपोलीस अधीक्षक दत्तात्राय कराळे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉएनएसचव्हाणजामनेरचे नगराध्यक्ष सौसाधनाताई महाजनभडगावचे नगराध्यक्ष राजेंद्र पाटीलपाचोराचे नगराध्यक्ष संजय गोहीलजिल्हा परिषद सभापती पोपट तात्या भोळे,  प्रभाकर सोनवणेदिलीप पाटीलमाजी आमदार दिलीप वाघउदय वाघविविध शहरांमधून आलेले तज्ज्ञ डॉक्टर यांच्यासह इतर मान्यवर मान्यवर उपस्थित होते.  

यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री  गिरीश महाजन म्हणालेपाचोरा भडगाव हे दोन मिळून महाआरोग्य शिबीर घेण्यात आले आहेया शिबीरात संपूर्ण जनसागर लोटला आहेया शिबीरात रुग्णांना औषधे मोफत दिला जात आहेरुग्णांना भोजनाची विनामुल्य व्यवस्था करण्यात आली आहेमुंबईपुणेनाशिक येथील डॉक्टर्स येथे येवून रुग्णांची तपासणी करीत आहेअसे  डॉक्टर जेव्हा रुग्णांची तपासणी करतात त्यावेळी रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.  पैसे अभावी बऱ्याच लोकांच्या आजारावर उपचार होत नाहीअशा उपेक्षित लोकांच्या उपचाराची जबाबदारी या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून घेण्यात आली आहेयासाठी कोणालाही खर्च करण्याची आवश्यकता नाही.  याशिबीरासाठी अनेक दानशूर व्यक्तीसंस्था यांनी मदत केली आहे.  प्रत्येक आठवड्यात आरोग्य शिबीर घेण्यात येत असूनही या या शिबीरांमध्ये गर्दी होत असतेयावरुन समाजातील  लोकांना आरोग्याची गरज आहे.  यासाठी जळगाव येथे मेडिकल हब सुरु करण्यात येत आहेयेणाऱ्या काळात मोठ्या शस्त्रक्रीयाउपचारासाठी कोठेही जाण्याची गरज नाहीसर्व सुविधा जळगावात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेपाचोरा येथे एक मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहेज्या रुग्णांना तातडीची उपचाराची गरज आहे अशा रुग्णांना  उपचारासाठी  मुंबईपुणेनाशिक यासारख्या ठिकाणी पाठविण्यात येणार आहेशिबीर संपल्यानंतरही ही सुविधा नागरिकांना देण्यात  येणार आहेभविष्यात जे रुग्ण असतील त्यांनी फक्त्‍ आमच्यापर्यंत पाठवात्यांची पुढील जबाबदारी आम्ही घेवू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार हरिभाऊ जावळे यावेळी म्हणालेशेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या सुविधा देण्याच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील सलग दुसरे महाआरोग्य शिबीर पाचोरा येथे संपन्न होत आहेफैजपूर येथील शिबीराचा अनुभव नवीन होता.  या शिबीरात डॉक्टर्स यांच्यासह आशा कर्मचारीस्वयंसेवक जीव ओतुन काम करीत आहेतयासाठी इश्वरीय शक्ती लागतेही शक्ती गिरीष महाजन यांच्याकडे आहेही शक्ती त्यांना ज्या उर्जेतून मिळते त्याच उर्जेतून आपणही शक्ती घ्यावीशेवटच्या रुग्ण तपासणीपर्यंत डॉक्टर्स शिबीराच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळक यावेळी म्हणालेपहिल्या ग्रामीण महाआरोग्याचा अनुभव फैजपूर येथील शिबीरात मिळालापाचोरा येथे दुसरे शिबीर संपन्न होत आहे.रुग्णांना मुंबई – पुणे येथे घेवून जाणे व परत आणणे हे काम जीएमफाऊंडेशनमार्फत होत आहेअसे शिबीर संपूर्ण महाराष्ट्रात होत आहेया शिबीरांचा जनतेला निश्चितच उपयोग होईल असेही त्यांनी सांगितले यावेळी जी.एमफाऊंडेशतर्फे पाच ॲम्बुलन्स व  शेवपेटया जळगाव जिल्हयासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेतजिल्हयासाठी एकूण १७ ॲम्बुलन्स उपलब्ध झाल्या आहेत

या शिबीरात येणाऱ्या रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये यासाठी  शिबीराच्या ठिकाणी चौकशी कक्षपुरुषांसाठी व महिलांसाठी प्रसाधन गृह होतेया शिबीरास आरोग्यमहसुलपोलीस विभागाच्या यंत्रणेने मोठया प्रमाणात सहकार्य केले.  पुढील शिबीर पारोळा-अमळनेर हे दोन तालुके मिळून होणार आहे.

कुमार कदम यांचा ब्लॉग..