इतर बातम्या

मुंबईतील मालाड मार्वे येथील रो रो जेट्टी सेवेचे रविवारी भूमीपूजन

मुंबई - मुंबईमधील मालाड-बोरिवली येथील व्यावसायिक, नोकरदार, मच्छिमार बांधवांना सुलभ व जलद वाहतुकीसाठी मालाड-मार्वे येथे रो रो जेट्टीचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या रविवार १९ नोव्हेंबर रोजी शिक्षणमंत्री व मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

मालाड मार्वे येथे सायंकाळी ४.०० वाजता आयोजित कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्यमंत्री डॅा. दीपक सावंत, महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, मुंबई मनपाचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अस्लम शेख, नगरसेविका स्टेफी केणी, महाराष्ट़ मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे, जिल्हाधिकारी दीपेन्द्र कुशवाह आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.

मच्छीमारांना पॅसेंजर बोटी उपलब्ध नाहीत, त्यांना वाळूतून जावे लागते, आजारी व्यक्तींची गैरसोय होते, म्हणून रो रो जेट्टी सुरु करण्यात येत आहे. यापूर्वी मनोरी गावातून मालाड येथे पोहचण्यासाठी गोराई, उत्तन, भाईंदर या रस्त्याच्या मार्गे पोहचावे लागत असे. या सुमारे ३७ किलोमीटरच्या प्रवासाला सुमारे २ तासांचा अवधी लागायचा मात्र रो रो जेट्टी मुळे या प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. मनोरी, गोराई, उत्तन भाईंदर येथे चारचाकी वाहनांना जाण्याकरीता सुविधा उपलब्ध होणार आहे. 

कुमार कदम यांचा ब्लॉग..