इतर बातम्या

‬गानसम्राज्ञी लता मगेशकर पुरस्कार श्रीमती पुष्पा पागधरे यांना २६ नोव्हेंबर रोजी प्रदान होणार

मुंबई   - राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात सन्मानाचा दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यंदा श्रीमती पुष्पा पागधरे यांना दि.२६ नोव्हेंबर रोजी यशवंत नाटय मंदिर,माटूंगा येथे सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे.प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रु.५ लाख रोखमानपत्र,सन्मानचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्या नावाची घोषणा केली होती. यापूर्वी हे पुरस्कार श्रीमती माणिक वर्माश्रीनिवास खळेगजानन वाटवेदत्ता डावजेकरपं.जितेंद्र अभिषेकीपं.हदयनाथ मंगेशकरज्योत्सना भोळे,  आशा भोसलेअनिल विश्वाससुधीर फडकेप्यारेलाल शर्मा,रवींद्र जैनस्नेहल भाटकरमन्ना डेजयमाला शिलेदार,  खय्याममहेंद्र कपूरसुमन कल्याणपूरसुलोचना चव्हाणयशवंत देवआनंदजी शहाअशोक पत्कीकृष्णा कल्लेप्रभाकर जोगउत्तम ब्रिदपाल सिंग यांना प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडेमुंबईचे पालकमंत्रीसुभाष देसाईमहापौरविश्वनाथ महाडेश्वरखासदार  राहूल शेवाळेआमदार हेमंत टकले आमदार सदा सरवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गतवर्षीचे पुरस्कार प्राप्त विजेते  उत्तम सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार पागधरे यांना प्रदान केला जाणार आहे.

पुष्पा पागधरे यांचा जन्म १५ मार्च १९४३ रोजी झालासंगीताचे धडे लहानपणी त्यांचे वडील जनार्दन चामरे यांच्याकडून मिळाले. पुष्पाताईंनी त्यांचे गुरु आर.डी.बेन्द्रे यांच्याकडून शास्त्रीय संगीत आणि राग रागीनी यांचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईत्‍ येऊन गीतगझलभजन आणि ठूमरी हे सुगम संगीत घेण्यास सुरवात केली. पागधरे आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. प्रसिदध संगीतकार राम कदम यांनी त्यांना प्रथम देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटात गायनाची संधी दिली. बाळ पळसुलेसुधीर फडकेश्रीनिवास खळेप्रभाकर पंडितडी.एस.रुबेनविठठल शिंदेराम-लक्ष्मणविश्वनाथ मोरेयशवंत देव इत्यादी अनेक प्रसिदध संगीतकारांच्या चित्रपटांमध्ये त्यांना गायनाची संधी मिळाली.

त्यांना दोन वेळा शासनाच्या पुरस्कार सोहळयात पार्श्वगायिकेची पारितोषिके मिळाली आहेत. त्यांनी खुन का बदलाबिना माँ के बच्चेमुकददर का सिकंदर अशा अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्याचबरोबर त्यांनी मराठीभोजपुरीओडियाबंगाली,मारवाडीहरियानवीपंजाबीगुजराती आणि आसामी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

या पुरस्काराबरोबर ‘इतनी शक्ती हमें देना दाता’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना आदित्य्‍ बिलवकर यांनी सादर केली असून राहूल सक्सेनामुग्धा वैशपायनमधुरा कुंभारजयदीप बगवाडकरमाधुरी करमरकर हे गायक असून सागर टेमघरेअमित गोठीवरेकरअमोघ दांडेकरआशुतोष दांडगेदिनेश भोसलेवरद काठापूरकरमहेश खानोलकरकृष्णा मुसळेहनुमंत रावडे,विवेक भगतसिदधार्थ कदम व विजय जाधव हे वादक कलाकार आहेत. कोरस नितीन करंदीकर आणि समूह हे करणार असून विघ्नेश जोशी निवेदन करणार असून विनायक चव्हाण हे नृत्यदिग्दर्शन करणार आहेत. पुरस्कारार्थीचा सन्मानार्थ रसिंक प्रेक्षकांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक, संजय कृष्णाजी पाटील यांनी केले आहे.

कुमार कदम यांचा ब्लॉग..