इतर बातम्या

गावातील प्रत्येकाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळण्यासाठी प्रयत्नशील : बबनराव लोणीकर

पुणे - राज्यात शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजनेची कामे हाती घेतली आहेत. या योजनेमुळे गावातील प्रत्येक माणसाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळाले पाहिजेयासाठी आपण प्रयत्नशील आहोतअसे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे भुमिपूजन लोणीकर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बाबुराव पाचर्णेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती मनीषा पलांडेमुख्य अभियंता एस.एस.गरंडेउपविभागीय अभियंता श्रीमती अनिता कुलकर्णीकार्यकारी अभियंता व्ही.एस.आवटेशिरुर तालुक्याचे गट विकास अधिकारी संदिप जठारपुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती रेखाताई बांदलशिरुर तालुक्याचे सभापती सुभाषराव उमाप,सरपंच जयश्री भुजबळमाजी सरपंच रामभाऊ सासवडे आदी उपस्थित होते.

लोणीकर म्हणालेराज्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी शासनाकडून अडीच हजार कोटी इतक्या रक्कमेची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही चांगली योजना सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी कामे सुरु करण्यात आली आहेत. या योजनेमुळे राज्यातील जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळू शकेल. दुषित पाणी पिल्याने गावातील लोक आजारी पडतातती आजारी पडू नयेतत्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील जनतेला चांगले पाणी मिळाले पाहिजे. या नळपाणी पुरवठा योजनेसाठी पुणे जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ही योजना ५० वर्षे टिकेल अशी दर्जेदार कामे झाली पाहिजेत. मुख्यमंत्री टप्पा दोन योजनेचाही आराखडा तयार करण्याचे काम चालू आहे. राज्यातील अनेक जिल्हे हे हागणदारीमुक्त झाले आहेत. राज्यात स्वच्छता अभियानाचीही भरीव कामे झाली आहेत. बऱ्याचशा नद्या दुषित झाल्या आहेत. देशाचा विकासासाठी स्वच्छता अभियान राबवून चांगली कामे केली पाहिजेत. शिक्रापूरच्या विकासासाठी अधिक निधीची आवश्यकता असल्यास प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईलअसेही ते म्हणाले.

आमदार  पाचर्णे म्हणालेया गावामध्ये अनेक विकासाची कामे सुरु केली आहेत. शासनानेही या गावातील बऱ्याचशा समस्या सोडविल्या आहेत. शिक्रापूर-चाकण रस्त्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या गावातील प्रत्येकाने गावाच्या विकासासाठी सहभाग घेवून योग्य नियोजन करुन कामे करावीत.

यावेळी उमापमांढरेश्रीमती पलांडे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी केले तर आभार ग्रामपंचायतीचे सदस्य नवनाथ सासवडे यांनी मानले.

कुमार कदम यांचा ब्लॉग..